esakal | पासपोर्ट सेवा केंद्रांचे काम स्थगित; राज्य सरकारचा आदेश

बोलून बातमी शोधा

passport seva kendra closed due to lockdown
पासपोर्ट सेवा केंद्रांचे काम स्थगित; राज्य सरकारचा आदेश
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शुक्रवार (ता. २३) पासून ३० एप्रिलपर्यंत मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयांतर्गतची सर्व पासपोर्ट केंद्रे आणि टपाल कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्रांचे कामकाज थांबवण्यात आले आहे.

राज्य सरकारचा आदेश

‘ब्रेक द चेन’ उपक्रमाचा भाग म्हणून पीएसकेएस (PSKS) आणि पीओपीकेएसचे (POPKS) कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य सरकारच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे.

हेही वाचा: धक्कादायक! मृतदेह बांधणीसाठी रुग्णालयाकडून पैशांची मागणी; नातेवाइकांचा आरोप

डिजिटल माध्यमाद्वारे साधा संपर्क

मुंबई येथील चौकशी काउंटरसुद्धा ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. सर्व अर्जदार, ज्यांनी आधीच त्यांच्या भेटीची वेळ निश्चित केली आहे, त्यांना सेवा प्रदाता कंपनी टीसीएसद्वारे एसएमएसद्वारे कळवण्यात आले आहे. आजपासून १ मेपर्यंत या कार्यालयाच्या कोणत्याही पासपोर्ट सेवा केंद्रात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही पीएसकेएस अथवा पीओपीएसकेला भेट देऊ नये. अर्जदार मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयात दूरध्वनीद्वारे (०२२-२६५२००१६ अथवा १७) संपर्क करू शकतात. अथवा कोणत्याही माहितीसाठी rpo.mumbai@mea.gov.in या ई-मेलद्वारे संपर्क साधता येईल. शिवाय www.passportindia.gov.in हे संकेतस्थळ, ट्विटर हैंडल @rpomumbai अथवा क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या फेसबुकपेजच्या माध्यमातून संपर्क साधता येईल.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..