esakal | धक्कादायक! मृतदेह बांधणीसाठी रुग्णालयाकडून पैशांची मागणी; नातेवाइकांचा आरोप

बोलून बातमी शोधा

Death Corona Virus
धक्कादायक! मृतदेह बांधणीसाठी रुग्णालयाकडून पैशांची मागणी; नातेवाइकांचा आरोप
sakal_logo
By
सतीश निकुंभ

सातपूर (नाशिक) : कोरोनात अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष, महिलांना जीव गमवावा लागला आहे. संसर्गाने सर्वदूर हाहाकार माजविला असताना सातपूरच्या सुशीला हॉस्पिटलमध्ये मात्र मृत्यूनंतर देह बांधणीसाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. संबंधित रुग्णालयाविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

सातपूरच्या कार्बन नाका परिसरातील सुशीला हॉस्पिटलमध्ये देवीदास जाधव यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाकडून उपचारार्थ देण्यात आलेले बिल जाधव कुटुंबीयांकडून चुकते करण्यात आले. दरम्यान, उपचारार्थ दाखल जाधव यांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृत्यूनंतर देह बांधणीसाठी रुग्णालयाकडून अतिरिक्त पैशांची मागणी करण्यात. या वेळी संतप्त झालेल्या नातेवाइकांनी महापालिका प्रशासनाकडे धाव घेतली. झालेला प्रकार निदर्शनास आणून देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

हेही वाचा: नाशिक ग्रामीणला कोरोनाचा विळखा घट्ट! दैनंदिन आकड्यात शहराला पछाडले

रुग्णालयाविरुद्ध सातपूर पोलिसांत तक्रार

सातपूर परिसरातील सुशीला हॉस्पिटलमध्येच एका रुग्णाकडून आरोग्य विमा पॉलिसीमार्फत संपूर्ण रक्कम वसूल करूनही त्यांच्या नातेवाइकाकडून अधिकचे पन्नास हजार रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला. या संदर्भात सातपूर पोलिसांत तक्रार दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: गॅंगस्टर रवी पुजारीला पोलिस कोठडी; नाशिक न्यायालयाने सुनावला निर्णय