

Pathardi Bribery Case
esakal
पाथर्डी : पाथर्डी पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
चार दिवसांपूर्वी शहरात एक गुन्हा घडला होता. या गुन्ह्यात वाढीव कलम लावायचे नसल्यास पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी या कर्मचाऱ्याने या प्रकरणातील आरोपींकडे केली होती. तडजोडी अंती अडीच लाख रुपये घेण्याचे कर्मचाऱ्याने कबूल केले.
तक्रारदारांनी नाशिक लाचलुचपत विभागाशी संपर्क केल्यानंतर लाचलुचपत विभागाचे पथक शहरात दाखल झाले. पोलिस ठाणेपासून हाकेच्या अंतरावरच अडीच लाख रुपये घेताना त्याला पथकाने रंगेहात पकडले. यानंतर हा कर्मचारी राहत असलेल्या व इतर काही ठिकाणी पथकाने छापे टाकले.
या कर्मचाऱ्याने ही लाच आपल्या एकट्यासाठी घेतली की, आणखी कोणी अधिकारी यामध्ये सहभागी आहेत, याची कसून चौकशी पथक करत आहे, तर घटनेनंतर काही पोलिस अधिकाऱ्यांनी मोबाइल स्वीचऑफ केले.
रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पाथर्डी पोलिस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. तीन महिन्यापूर्वीही एक पोलिस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला होता, तर परत असाच प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.