Navratri 2023 : नवरात्रोत्सवात खानदेशी गितांचाच बोलबाला; गीत पंखिडा... बरोबरच देवीच्या गीतांना अधिक पसंती

Dandiya
Dandiya

Navratri 2023 : शहराबरोबरच ग्रामीण भागात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. टिपरी व गरबा नृत्यात तरुणाई दंग होत आहे. उत्सवामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

गरबा नृत्यासाठी ध्वनिक्षेपकावर खानदेशी गीतांचाच बोलबाला दिसून येत आहे. पारंपरिक गुजराती गरबा काहीसा मागे पडला आहे. ध्वनिक्षेपकावर देवीच्या खानदेशी गीतांचीच झलक उत्सवात प्रकर्षाने जाणवते. (people liking Khandeshi song soundtrack for garba dance navratri nashik news)

अलिकडच्या काळात नवरात्रोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. गाव व वाड्या-वस्त्यांवरदेखील देवीची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या सार्वजनिक मंडळांची संख्या वाढली आहे. पूर्वी शहरी भागातच टिपरी व गरबा नृत्य केले जायचे.

सध्या ग्रामीण भागात टिपरी व गरबा नृत्य शिगेला पोहोचले आहे. यात खानदेशी गीतांना प्राधान्य दिले जात आहे. गुजराती गरबा गीत पंखिडा हो पंखीडा.... पंखिडा तू उडी ना जाना पावा गड रे.... हे आवर्जून सर्वत्र ऐकायला मिळायचे. इतर काही गुजराती गरबा गिते नवरात्र उत्सवात कानी पडत आहेत.

खानदेशी गीतांचा बोलबाला दशकापासून सुरू आहे. लग्नसोहळे व इतर समारंभांमध्येही या गीतांनाच प्राधान्य दिले जाते. नवरात्र उत्सवात टिपरी व गरबा नृत्यासाठी खानदेशी गीतांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Dandiya
Navratri 2023 : वडापाव आवडतो पण उपवास आहेत? असा बनवा उपवासाचा बटाटे वडा

‘अंबा व मनी मायबाई...’, ‘माय तुना दार मा उबरन झाड...’, ‘अंबाबाईना रथ निघे’, ‘नांदुरी गड ले जासू...’, ‘मी तुना सजना, तू मनी सजनी’, ‘वाडी वाडी ये चंदन वाडी, कोण नेस ये गुलाबी साडी...’, ‘पोरी तुना माग मी फिरय य....’, ‘घडयालना काटा गर गर फिरे....’,‘रथ काय चालना वणीना गडले’, ‘मायना डोंगर हिरवागार’, ‘छोटीशी कानबाई लाडाची’ आदी गाण्यांची धूम आहे. खानदेशी गीते सर्वांच्या ओठावर आहे. अनेक ठिकाणी गाणे गात टिपरी नृत्ये केली जात आहेत.

"खानदेशी गीतांना नवरात्रोत्सवात प्राधान्य दिले जात आहे. ही आनंदाची बाब आहे. आई सप्तशृंगी मातेवर गीते लिहिली. गाणी व गीत निर्मितीच्या माध्यमातून घरोघरी अहिराणी भाषेचे वैभव पोहोचले. गावागावांत नवरात्रात खानदेशी गाण्यांचा बोलबाल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे." - आबा चौधरी, शिरपूर रथाचे मानकरी

Dandiya
Navratri 2023 : आठवी माळ, भगवान महादेवांनी चेष्टा केली म्हणून देवी पार्वतीला मिळालं महागौरी रूप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com