esakal | दिव्यांग विद्यार्थ्यांची दाखले मिळविण्यासाठी परवड
sakal

बोलून बातमी शोधा

People with disabilities

दिव्यांग विद्यार्थ्यांची दाखले मिळविण्यासाठी परवड

sakal_logo
By
संदिप पवार

डीजीपीनगर (नाशिक) : महापालिका हद्दीतील दिव्यांग प्रमाणपत्र नूतनीकरण केंद्र बंद असल्याने नवीन प्रवेश घेणाऱ्या व नोकरीनिमित्त दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिव्यांगांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे हे केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.
कोरोना काळात डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, जुने व नवीन बिटको रुग्णालय येथे कोरोना संक्रमणाच्या आधी अपंगत्व प्रमाणपत्र व नूतनीकरण केंद्र सुरू होते. मात्र, याठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याने हे केंद्र दीड- दोन वर्षांपासून बंद आहेत. People with disabilities face difficulties in obtaining disability certificates


यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांची दाखले मिळविण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी चांगलीच धावपळ होत असून, या ठिकाणी दाखले मिळवण्यासाठी रोजच गर्दी होत आहे. मात्र, दाखले किंवा दाखल्याचे नूतनीकरण होत नसल्याने केंद्र कधी सुरू होणार, याबाबत पुरेशी माहितीही मिळू शकत नसल्याने लाभार्थ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यामुळे विद्यार्थी आणि लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. मनपा प्रशासनाने मार्ग काढून दिव्यांगाची परवड दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. शहरातील दिव्यांग, तसेच काही अंशी टक्केवारीनुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण, उच्च शिक्षणासाठी मनपा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. शासकीय योजनांच्या व प्रवेशासाठी असलेल्या रिक्त जागांच्या पात्रता निकष पूर्ण करून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रमाणपत्र व नूतनीकरण दर तीन वर्षांनी करणे अनिवार्य असते. कोरोनामुळे बंद केलेले केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: पाणी टंचाई नको तर पाउस आणा; पालकमंत्र्यांचा भाजपला सल्ला

शासकीय योजनांच्या लाभासाठी व शालेय प्रवेशासाठी मनपा हद्दीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना दाखले नूतनीकरण व नवीन दाखले मिळण्याकामी अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हे केंद्र तत्काळ सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
बाळासाहेब सोनवणे, जिल्हाध्यक्ष, अपंग संघटना

loading image