Ph.D. Scholarship Exam : पीएच. डी. अधिछात्रवृत्तीसाठी 10 जानेवारीला परीक्षा

बार्टी, सारथी आणि महाज्‍योती या संस्‍थांतर्फे पीएच.डी अधिछात्रवृत्तीकरिता रविवारी (ता.२४) झालेली परीक्षा प्रश्‍नपत्रिकेच्‍या पुर्नरावृत्तीमुळे वादात सापडली होती.
PhD Examination on 10th January for Scholarship nashik
PhD Examination on 10th January for Scholarship nashik sakal

Ph.D. Scholarship Exam : बार्टी, सारथी आणि महाज्‍योती या संस्‍थांतर्फे पीएच.डी अधिछात्रवृत्तीकरिता रविवारी (ता.२४) झालेली परीक्षा प्रश्‍नपत्रिकेच्‍या पुर्नरावृत्तीमुळे वादात सापडली होती.

यासंदर्भात काल (ता.२६) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या सेट विभागाकडून तातडीची बैठक घेण्यात आली. (PhD Examination on 10th January for Scholarship nashik news)

विद्यार्थ्यांच्‍या मागणीनुसार चाळणी परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेताना त्‍यासाठी १० जानेवारीची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. अधिछात्रवृत्तीसाठी झालेल्‍या या परीक्षेत २०१९ च्‍या सेट परीक्षेतील पेपर क्रमांक एक विचारण्यात आल्‍याने परीक्षार्थ्यांनी नाराजी व्‍यक्‍त केली होती. नाशिकसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर येथील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली होती.

चाळणी परीक्षेतील प्रश्नपत्रिका पुनरावृत्ती झाल्याच्‍या संदर्भात प्राप्त विविध तक्रारींच्‍या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या महाराष्ट्र राज्‍यस्‍तरीय पात्रता परीक्षा (सेट) मार्फत काल (ता.२६) विद्यापीठात तातडीची बैठक बोलावली होती. याप्रसंगी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बार्टी, महाज्योती व सारथी या संस्‍थेचेही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पीएच. डी अधिछात्रवृत्तीसाठीच्‍या चाळणी परीक्षेतील प्रश्नपत्रिका पुनरावृत्तीसह विविध बाबींचा आढावा बैठकीप्रसंगी घेण्यात आला. चाळणी परीक्षेचे अतितत्काळ विहित कालमर्यादेत आयोजन करण्याबाबत सेट विभागास सूचित केले होते.

PhD Examination on 10th January for Scholarship nashik
Scholarship Exam : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून रविवारी शिष्यवृत्ती सराव परीक्षा

ही चाळणी परीक्षा आणि सेट या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या कारणांसाठी आयोजित केल्या जात असल्याने, प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याने कोणत्याही विद्यार्थ्यांस फायदा किंवा नुकसान संभवत नसल्‍याचे मत यावेळी मांडण्यात आले. तसेच चाळणी परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्‍याचे नमूद करताना कोणताही गैरप्रकार घडला नसल्‍याचा दावा बैठकीत करण्यात आला.

दरम्‍यान, विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता, चाळणी परीक्षेने पुन्हा आयोजन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पीएच. डी. अधिछात्रवृत्तीसाठी चाळणी परीक्षा १० जानेवारीला घेतली जाणार आहे. परीक्षेची सविस्तर माहिती व वेळापत्रक बार्टी, सारथी व महाज्‍योती या संस्‍थांच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिले जाणार असल्‍याचेही जाहीर केले आहे.

PhD Examination on 10th January for Scholarship nashik
Scholarship Exam : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com