esakal | आश्चर्यच! डुक्कर मादीच्या पोटी वानरासारख्या पिल्लाचा जन्म; गावात चर्चेचा विषय
sakal

बोलून बातमी शोधा

pig gave birth

आश्चर्यच! डुक्कर मादीने दिला वानरासारख्या पिल्लास जन्म

sakal_logo
By
संतोष घोडेराव

अंदरसूल (जि.नाशिक) : भारत देशात रोज काही ना काही तरी आश्चर्य घडत असतं. आता डिजीटलच्या जमान्यात या गोष्टी पटकन व्हायरलही होतात. नाशिक जिल्ह्यातील अंदरसूल गावात एका डुक्कर मादीच्या पोटी चक्क एका वानराने जन्म घेतला..आणि हाच सर्वत्र चर्चेचा विषय बनला. नेमका प्रकार काय...वाचा पुढे...(pig-gave-birth-to-baby-monkey-nashik-marathi-news)

डुकरनीने दिला वानरासारख्या पिल्लास जन्म

येथे एका डूकरनीने जन्म घातलेल्या पाच पिल्लांपैकी एका पिल्लाचे तोंड चक्क वानरासारखे असल्याने हे दृश्‍य बघण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी झाली. येथील वराह पालक वाल्मिक बाबू पवार यांच्या डुकरिणीने बुधवारी सकाळी (ता. ७) झालेल्या प्रसुतीदरम्यान पाच पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी एका पिल्लाचे मुख चक्क वानरासारखे दिसत होते. संपूर्ण गावात हा विषय चर्चेचा बनला आहे. परिसरातील महिलांनी या पिल्लाला हळद, कुंकू लावून दर्शन घेतले. परंतु, सोशल मीडियावर या घटनेचा व्हीडीओ पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ. बाळासाहेब होन यांनी बघितला असता हा आनुवंशिक बदल असून, नैसर्गिक घटना असल्याचे सांगितले.

हेही वाचा: कोरोनाचा प्रभाव कमी, मात्र पाय दुखण्याच्या व्याधींमध्ये वाढ

हेही वाचा: नाशिककरांचे स्वप्न आजपासून प्रत्यक्षात! शहर बस वाहतूक सेवा सुरू

loading image