Pimpalgaon Baswant
sakal
पिंपळगाव बसवंत: झोकात प्रवास व्हावा, या उद्देशाने १६ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला मुंबई- आग्रा महामार्ग प्रवाशांसाठी वरदानाऐवजी सध्या शाप ठरावा, अशी सध्याची स्थिती आहे. खडकजांब ते दहावा मैल (ओझर) महामार्ग क्षेत्रात तीन उड्डाणपूल कम अंडरपास उभारणीच्या कासवगतीने सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीचा श्वास कोंडला जात आहे.