Election
sakal
एस. डी. अहिरे-पिंपळगाव बसवंत: पिंपळगावला काही प्रभागांतील लढतींमधील हवा निघून गेल्याचे दिसते. नगरसेवकपदाच्या काही लढती एकतर्फी होण्याची चिन्हे असून, अपवादात्मक ठिकाणी कडवी झुंज होणार आहे. मात्र, नगराध्यक्षपदासाठी ‘काँटे की टक्कर’ होणार, हे निश्चित आहे. राष्ट्रवादीचे इंजिनिअर गोपाळकृष्ण गायकवाड, भाजपचे डॉक्टर मनोज बर्डे, तर काँग्रेसचे संतोष गांगुर्डे यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे.