esakal | गरजू रुग्‍णांना काही मिनिटांत प्‍लाझ्मा उपलब्ध; 'तो' ग्रुप ठरतोय आशेचा किरण!

बोलून बातमी शोधा

plasma donate

गरजू रुग्‍णांना काही मिनिटांत प्‍लाझ्मा उपलब्ध; 'तो' ग्रुप ठरतोय आशेचा किरण!

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : कोरोनाचा (corona virus) फैलाव वाढत असताना ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येने उच्चांक गाठला होता. अशा परिस्‍थितीत रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना (patients) सहकार्यासाठी काही दिवसांपूर्वी द प्‍लाझ्मा ग्रुप (the plazma group) नाशिकची स्‍थापना केली. काही दिवसांतच या ग्रुपमार्फत अनेक गरजू रुग्‍णांकरिता काही मिनिटांत प्‍लाझ्माकरिता दाते उपलब्‍ध करण्यात आले आहेत, तर काहींना रुग्‍णालयात खाटा मिळविण्यासाठी ग्रुपची मदत झाली आहे. (Plasma available to needy patients)

द प्‍लाझ्मा ग्रुप’ ठरतोय आशेचा किरण

एरवी सोशल मीडियावर तासनतास तरुणाई वेळ वाया घालवते, अशी टीका केली जाते, परंतु कोरोनाकाळात या समाज माध्यमाचा वापर सकारात्‍मकरीत्‍या होताना दिसतो आहे. गरजूंना मदतीच्‍या उद्देशाने ॲड. अजिंक्‍य गिते यांनी व्‍हॉट्‍सॲप ग्रुप स्‍थापन केला. बघता बघता ही एक चळवळ होत असून, अनेक होतकरू युवक-युवती या ग्रुपशी जोडले गेले आहेत. सोनाली पिंगळे, चित्रा अहिरे, किरण जाधव, संतोष आढाम, राहुल बोरसे, एजाज शेख, अंकिता अहिरे, केया राजे, नंदन बोरस्‍ते, सुचित, श्रीया गोखले, ओमकार सानप, डॉ. प्रतीक देवरे, गीतिका सचदेवा, लक्ष्मीकांत पेनमहाले आदींसह युवक-युवती पुढाकार घेत आहेत.

हेही वाचा: आरोग्य सांभाळा! नाशिकमध्ये चालता-बोलता होतायेत मृत्यू

अन्य शहरांतील रुग्‍णांनाही मदतीचा हात

नाशिकमधील रुग्‍णांसोबतच राज्‍यातील अन्‍य काही शहरांतील रुग्‍णांनाही या ग्रुपच्‍या सहाय्याने मदतीचा हात दिला गेला. पुण्यात सुमारे २० रुग्‍णांना प्‍लाझ्मा उपलब्‍ध करून देण्यात येत आहे. नवी मुंबईत विश्‍वास दाते यांच्‍या माध्यमातून २५ रुग्‍णांची सहाय्यता केली. सातारा ते थेट कऱ्हाड आणि सांगलीपर्यंत रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना मदत झाली आहे.

सामाजिक जाणिवेतून आमचा ग्रुप काम करत असून, आतापर्यंत नाशिकमध्ये सुमारे आठशे गरजूंना प्‍लाझ्मा उपलब्‍ध करून देण्यात यश आले आहे. या चळवळीतून सदस्‍यांनी युवकांच्‍या शक्‍तीचे दर्शन घडविताना रुग्‍णांना वेळीच मदत केल्‍याने त्‍यांना जीवदान दिले आहे. पुढेही प्‍लाझ्मा, बेड आदींबाबत मदतकार्य सुरू राहील.

-ॲड. अजिंक्‍य गिते, संस्‍थापक, द प्‍लाझ्मा ग्रुप

हेही वाचा: खडतर प्रवासातून यश! सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती