PM Modi Nashik Visit : प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळाची SPG पथकाकडून पाहणी; आयुक्तालयात दिवसभर बैठका

पोलीस आयुक्तालयात विशेष बैठकीतही आढावा घेत चोख बंदोबस्तासंदर्भात सूचना केल्या.
PM Modi
PM Modiesakal

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी (ता.१२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.९) एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप)च्या पथकाने बंदोबस्ताचा आढावा घेत, प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.

त्यानंतर, पोलीस आयुक्तालयात विशेष बैठकीतही आढावा घेत चोख बंदोबस्तासंदर्भात सूचना केल्या. (PM Modi Nashik Visit Inspection by SPG Team All day meeting at police Commissionerate news)

नाशिकमध्ये येत्या शुक्रवारी (ता.१२) युवा दिनानिमित्ताने राष्ट्रीय युवा महोत्सव होतो आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे.

तर, पंतप्रधान मोदी यांच्या प्रस्तावित दौऱ्यानुसार औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागेत असलेल्या मैदानावर हेलिपॅड बनविण्यात आले आहे. तर निलगिरी बागेतून पंतप्रधान मोदी हे मोटारीने रोड-शो करीत तपोवनातील कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरील बंदोबस्ताची व कार्यक्रमस्थळाची पाहणी करण्यासाठी एसपीजीचे पथक मंगळवारी (ता.९) नाशिकला आले होते.

या पथकाने पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित दौऱ्याचा सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गाची पाहणी, कार्यक्रमस्थळीचीही पाहणी केली.

त्यानंतर एसपीजीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयात आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये बंदोबस्तासह सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेतला.

PM Modi
PM Modi Nashik Visit: पंतप्रधानांचा रोड-शो एक किमी अंतरासाठी; बंदोबस्तासाठी परजिल्ह्याचे पोलिस येणार

गोपनीय शाखा सतर्क

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या गोपनीय शाखाही सतर्क झाल्या आहेत. तर, व्हीआयपी सुरक्षापथकांसह गोपनीय शाखेच्या अधिकाऱ्यांनी शहरात तळ ठोकला आहे.

शहरातील हॉटेल्स, लॉजेसची नियमित तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे, बसस्थानके, रेल्वेस्थानक याठिकाणीही करडी नजर ठेवली जात आहे.

तसेच, या दौऱ्यात विरोधक वा संघटनांकडूनही निदर्शने केले जाण्याची शक्यता पाहता, पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करतानाच नोटीसा बजाविण्यात येणार असल्याचे समजते.

चोख बंदोबस्ताचे नियोजन

शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार, चार पोलीस उपायुक्त, सात सहायक आयुक्त यांच्यासह १०० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ८०० पोलीस कर्मचारी शहर पोलीस आयुक्तालयाचे असतील.

तर, परजिल्ह्यातून १०० पोलीस निरीक्षक व १९०० पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

याशिवाय, राज्य गुप्तवार्ता विभाग, विशेष सुरक्षा विभाग, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डॉगस्क्वॉड, शीघ्रकृती दल, राज्य राखीव दलाच्या तुकड्याही सज्ज असणार आहेत

PM Modi
Sudhakar Badgujar Fraud Case: बडगुजरांना अपहारप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; अंतरिम जामीन सुनावणीला गैरहजर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com