Narhari Zirwal: 'घर का ना घाट का करून ठेवलंय', झिरवाळ यांचे मानापमान नाट्य, PM मोदींच्या सभेत व्यासपीठावर नाही तर...

Narhari Zirwal: विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे सभेवेळी श्रोत्यांमध्ये स्थानापन्न झाले त्यावेळी सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यांना व्यासपीठावर आणण्यासाठी संयोजकांची चांगलीच दमछाक झाली.
Narhari Zirwal
Narhari ZirwalEsakal

पिंपळगाव बसवंत : महायुतीच्या घटकापक्षांच्या काही नेत्यांची चलबिचल व सर्व काही आलबेल नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत आज पुन्हा एकदा समोर आले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे सभेवेळी श्रोत्यांमध्ये स्थानापन्न झाले त्यावेळी सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यांना व्यासपीठावर आणण्यासाठी संयोजकांची चांगलीच दमछाक झाली. ते मंचावर आले; पण सुमारे वीस मिनिटे हे मानापमान नाट्य रंगले.

विधानसभेचे उपाध्यक्ष असल्याने राजकीय संकेतानुसार व्यासपीठावर झिरवाळ यांची बसण्याची व्यवस्था केलेली होती. पण ते प्रेक्षकांमध्ये बसले. याची कुणकुण ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांना लागताच त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. व्यासपीठावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संयोजक झिरवाळ यांना व्यासपीठावर येण्यासाठी हातवारे करीत होते. अखेर महाजन हे झिरवाळ यांना व्यासपीठावर घेऊन आले.

Narhari Zirwal
अमित शाहांच्या पंतप्रधानपदाची तारीख सांगितली पण मालीवाल यांचा प्रश्न आल्यावर मात्र... केजरीवालांच्या मदतीला धावले अखिलेश

घरका ना घाट का करून ठेवलंय : झिरवाळ

‘‘महायुतीच्या डॉ. भारती पवार यांच्यासाठी मी प्रचार करतोय. पण एका धार्मिक सोहळ्यानिमित्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांबरोबर एकत्र आल्याने ‘मला घरा ना घाट का’ करून ठेवले आहे. मी पण राजकारणातील दिग्गज नेत्यांबरोबरच अनेक वर्षे काम केले आहे. आदिवासी समाजातील असून ‘हा तरा हा अन ना तर ना’ अशी माझी भूमिका असते. जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांच्यात बसलो होतो,’’ असे त्यांनी स्पष्टीकरण झिरवाळ यांनी दिले.

Narhari Zirwal
PM Modi Road Show: "मोदी, भाजप अन् महायुतीला शोभतं का?" पंतप्रधानांच्या रोड शोमुळे , मुंबईकरांचा संताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com