''पीएम राहत''मध्ये दीड लाखांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार

''पीएम राहत''मध्ये दीड लाखांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार
Published on: 
टूडे साठी --------------- ‘पीएम राहत’ मध्ये मोफत कॅशलेस उपचार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : रस्ते अपघातातील जखमींना पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी केंद्र शासनाची ‘पीएम राहत’ योजना आता नाशिक जिल्ह्यात घराघरात पोहोचवली जाणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी महापालिका, पोलिस, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला प्रचार-प्रसिद्धीचे निर्देश दिले आहेत. अपघातानंतरचा पहिला तास म्हणजे ‘गोल्डन अवर’ असतो. त्यात खर्चाची चिंता न करता तातडीने उपचार मिळावेत, हाच या योजनेचा उद्देश आहे. जिल्ह्यात माहिती, शिक्षण व संवाद (आयईसी) उपक्रमांतर्गत गर्दीची सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, रुग्णालये, बसस्थानके येथे होर्डिंग्ज, स्टँडीज, माहितीफलक आणि डिजिटल स्क्रीनवरून योजनेची माहिती दिली जाणार आहे. अपघात झाला की, तातडीने जवळच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात न्या, उपचारासाठी पैसे नसले तरी उपचार थांबवले जाणार नाहीत, हाच संदेश प्रशासनाकडून दिला जात आहे. मोटार वाहन कायद्यानुसार योजना असून अपघाताच्या तारखेपासून जास्तीत जास्त ७ दिवसांपर्यंत उपचार मिळणार तसेच प्रत्येक पात्र अपघातग्रस्ताला १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.