नवी बेजच्या कांदाचोरीचा २४ तासांत तपास! कळवण पोलिसांचे दिघावकरांकडून विशेष कौतुक

police arrest 4 suspects for onion theft
police arrest 4 suspects for onion theft

नाशिक/कळवण : कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने चोरांनी आपला मोर्चा चाळीतील कांद्याकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ पसरली. मात्र नवीबेजच्या देवरे वस्तीवर बुधवारी (ता.५) झालेल्या कांदाचोरीचा कळवण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास लावला आहे. कळवण पोलिसांच्या या विशेष कामगीरीचे कौतुक होत आहे.

कळवण येथील राजकुमार दशरथ देवरे यांनी त्यांच्या भेंडी शिवारातील कांदा चाळीतून २५ क्विंटल कांदा चोरीला गेल्याची फिर्याद बुधवारी कळवण पोलिस स्टेशनला दिली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी जुनी भेंडी चौफुलीवरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी तपासले. मात्र काही निष्पन्न झाले नाही, भेंडी गावातून वरवंडी मार्गे मंगळवारी (ता.४) रात्री पीक वाहन गेल्याची आणि तेच वाहन बुधवारी (ता.५) दुपारी वरवंडी शिवारात मळ्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना मिळाली.

पोलिसी खाक्या दाखविताच तो बोलायला लागला

माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांचा सापळा रचला त्यात वाहतूक पोलीस सचिन राऊत यांना भेंडी ते वरवंडी रस्त्यावर गस्तीवर पाठविल्यानंतर त्यांना पीकअप भेंडी गावाकडे येत असल्याचे आढळले. राऊत यांनी पीकअप वाहन चालकाकडे चौकशी केले असता शेणखत घेण्यासाठी गेल्याचे सांगून उडवाउडवीचे उत्तरे दिली. यामुळे संशय आल्याने कळवण पोलीस स्टेशनला पीक अप आणल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच वाहन चालक राजेंद्र देवरे याने राजकुमार देवरे यांच्या कांदा चाळीतून चौघांनी कांदा चोरी केली आणि पिंपळगाव बसवंत येथे कांदा विकल्याची कबुली दिली. यामुळे पोलीसांना देवरेसह गोविंदा कृष्णा चिंधे, खुशाल भिका पवार, जगन मोतीराम जाधव यांना ताब्यात घेतले. याबाबत कळवण पोलीसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

 इतर घटनांमध्ये सहभागाची शक्यता

कसमादे पट्ट्यातील कांदा चोरीत या चौघांचा संबंध असण्याची शक्यता असून देवरे वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या चोरी प्रकरणात ह्या चौघांचा हात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चोरी संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेने ह्या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

 डॉ. दिघावकरांकडून कौतुक 

कसमादे पट्ट्यासह देवरे वस्तीवरील कांदा चोरीबाबत नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी मंगळवारी (ता.४) विचारणा केल्यानंतर बुधवारी (ता.५) कळवण पोलिसांच्या या विशेष कामगिरीमुळे डॉ. दिघावकर यांनी कळवण येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचा सत्कार करून कळवण पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com