esakal | बकरी ईदनिमित्त मशिदीत गर्दी केल्याप्रकरणी विश्वस्तांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Bakari EID

बकरी ईदनिमित्त मशिदीत गर्दी केल्याप्रकरणी विश्वस्तांवर गुन्हा

sakal_logo
By
यूनुस शेख

जुने नाशिक : त्यागाचे प्रतीक असलेली बकरी ईद बुधवारी (ता. २१) राज्यासह शहरात साजरी झाली. कोरोना प्रादुर्भावामुळे ईदगाह, मशीद, तसेच सार्वजनिक ठिकाणी ईदची सामुदायिक नमाजपठण करण्यास प्रशासनाकडून बंदी असल्याने मुस्लिम बांधवांकडून घरीच नमाजपठण करत बकरी ईद साजरी करण्याचे अवाहन करण्यात आले होते. कोरोना काळात ईद निमित्ताने मशिदीमध्ये गर्दी केल्या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (police case against trustees for crowding a mosque on the occasion of bakari Eid)

कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दिले होते आदेश

कोरोना (Coronavirus) प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी प्रशासनाकडून ईदगाह, मशिदमध्ये गर्दी न करता घरातच ईदचा नमाज पढण्याचे आदेश देण्यात आले होते. अशा आदेशाचे उल्लंघन करण्यात येऊन बुधवार (ता.२१) रोजी दुध बाजारातील शाही मशिदीमध्ये काही मुस्लिम बांधवांनी नमाज पठणासाठी गर्दी केली होती. याप्रकरणी विश्वस्त गयासोद्दिन अब्दूल कादीर (रा. दुधबाजार) यांच्याविरुद्ध उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांच्या तक्रारीवरून तसेच कथडा मशिद येथे गर्दी प्रकरणी हवालदार जयप्रकाश शिरोळे यांनी अब्दूल शाकूर सय्यद, नासिरखान रज्जाकखान पठाण, कुतुबुद्दीन दिलावर मुल्ला तसेच विश्वस्त आणि मौलाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल ला.

हेही वाचा: बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे मिळविली एमबीबीएसची पदवी

१५० किलो गोवंश मास जप्त

वडाळा नाका परिसरातील घरातून भद्रकाली पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या गोवंश प्राण्यांची सुटका केली. सुमारे १५० किलो गोवंशाचे मांसही जप्त करण्यात आले. याप्रकरणी अंमलदार गोरख साळूंके यांनी नासिर कयुम शेख (वय ३५), कयुम उर्फ बबलू शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(police case against trustees for crowding a mosque on the occasion of bakari Eid)

हेही वाचा: 'नाशिक-पुणे मार्गावरील टोल वसुली कशासाठी? तत्काळ बंद करा'

loading image