esakal | 'नाशिक-पुणे मार्गावरील टोल वसुली कशासाठी? तत्काळ बंद करा'
sakal

बोलून बातमी शोधा

nashik pune highway

'नाशिक-पुणे मार्गावरील टोल वसुली कशासाठी? तत्काळ बंद करा'

sakal_logo
By
राजेंद्र अंकार

सिन्नर (जि.नाशिक) : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर ते नाशिक टोलच्या लांबीतील रस्त्याची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने होणारी टोलवसुली तात्काळ बंद करावी. तसेच सिन्नर- शिर्डी रोड संगमनेर नाक्यापासून ते मुसळगावपर्यंत चौपदरी करावा अशी आग्रही मागणी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नाशिक येथे २१ जानेवारी २०२० ला कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सिन्नर नाशिक टोल रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत सविस्तर चर्चा झाली होती. संबंधित अधिकारी व ठेकेदारास काही ठिकाणी तात्काळ उपाय योजनाही करण्यास सांगितले होते. त्यामध्ये शेतमालाच्या वाहतुकीसाठी गरजेचे असणारे सर्व्हीस रस्ते पूर्ण केले नाहीत. (Stop-toll-collection-on-Nashik-Pune-route-marathi-news-jpd93)

शिर्डी- सिन्नर रस्ता चौपदरी करण्याची आमदार कोकाटेंची मंत्री गडकरींकडे मागणी

महामार्गालगतच्या गावात पथदीप लावलेले नसल्याने चौपदरी रस्ता असूनही सातत्याने अपघात वाढत आहेत. सिन्नर नाशिक महामार्गाच्या कार्यारंभ आदेशात नमूद केल्याप्रमाणे वाहनधारकांना उपलब्ध करुन द्यावयाच्या सोयीसुविधाही पुरवित नाहीत. केंद्र शासनाच्या धोरणानुसार कराराप्रमाणे टोल वसुली होत नाही. सिन्नर फाटा ते चेहडीपर्यतच्या रस्त्याचे काम न्यायालयाचा निकाल लागलेला असूनही अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.

त्या रस्त्यालाही द्या मंजुरी

सिन्नर शिर्डी या मार्गाचे संगमनेर नाक्यापासून ते मुसळगाव औद्योगिक वसाहतीपर्यंत चौपदरीकरण करावे ही मागणीही श्री कोकाटे यांनी केली आहे. सुमारे चार किलोमीटर लांबीचा हा रस्ता शिर्डी येथे नेहमी जाणारे भाविक तसेच मुसळगाव औद्योगिक वसाहतीत नेहमी ये जा करणारे कामगारांच्या वापराचा आहे. सध्या सुरू असलेल्या कामामध्ये या ४ किलोमीटर लांबीचा रस्त्यालाही मंजुरी द्यावी असी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: पाठित खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकविणार; बावनकुळे यांचा इशारा

हेही वाचा: गोदेच्या पुरात स्मार्टसिटीची कामे टिकणार का? नागरिकांचा सवाल

loading image