Nashik | जिल्हा बँकेत पोलिस आयुक्तांची ‘एन्ट्री’; मोठे थकबाकीदार रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pande cp.jpg

नाशिक जिल्हा बँकेत पोलिस आयुक्तांची ‘एन्ट्री’

sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : मोठ्या प्रमाणावर थकबाकी झाल्यामुळे जिल्हा बँक सध्या आर्थिक अडचणीतून काम करत असतानाच आता शहर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी जिल्हा बँकेत एन्ट्री करत कर्जवसुलीसाठी बँक प्रशासनास मदत करण्याची हमी दिली आहे. कर्जवसुलीसाठी थेट पोलिस आयुक्त यांनीच मदतीची हमी दिली असल्याने बँकेच्या मोठे थकबाकीदार बँकेच्या रडारवर असतानाच आता पोलिसांचे सहकार्य मिळणार असल्याने वसुलीचा तगादा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिस आयुक्तांच्या हमीमुळे बँकेच्या वसुलीला गतीदेखील मिळणार आहे.

शहर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी जिल्हा बँकेस अचानक भेट देत बँकेच्या प्रशासक यांच्याकडून कामकाज, वसुली आदीबाबत माहिती घेतली. या वेळी जिल्हा बँकेचे प्रशासक अरिफ यांनी बँकेच्या कामकाजाबाबत माहिती देताना सांगितले, की बँकेची आज अखेर शेती व बिगर शेतीचे २ हजार ३९७ कोटीची थकबाकी येणे बाकी आहेत. कर्जांची थकबाकी मोठी असल्याने पुन्हा आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेली आहे. यात जिल्ह्यातील विविध पक्षांचे आजी, माजी राजकीय पदाधिकारी व त्याच्या पतसंस्था व सोसायटी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असून, बँकेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी बड्या थकबाकीदार यांची स्वतंत्र यादीच करण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात सुरत-चेन्नई महामार्गासाठी ९९६ हेक्टर भूसंपादन

तसेच, बँकेतर्फे मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरू करण्यास सक्त आदेश दिलेले आहे. या दरम्यान पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनीच कर्जवाटपाची वसुली ही नियमाप्रमाणेच करा व ज्या ठिकाणी अत्यंत आवश्यक असेल, त्या ठिकाणी बँकेला कर्जवसुलीसाठी पूर्ण सहकार्य करण्याची हमी दिली. यामुळे आता बडे थकबाकीदार यांच्याकडे पोलिसांच्या मदतीने बँक वसुलीसाठी पूर्ण ताकदीने तगादा केला जाण्याची पूर्ण शक्यता आहे. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांच्यासह सरव्यवस्थापक, व्यवस्थापक व अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : जिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेस मारहाण; बाळाचा मृत्यू

loading image
go to top