Nashik Police Commissionerate : पोलिस आयुक्तालयाला हवे ‘हायटेक ड्रोन’! गर्दीवर करडी नजर

police commissionerate Nashik latest marathi news
police commissionerate Nashik latest marathi newsesakal

नाशिक : शहरात नेहमीच अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे (व्हीव्हीआयपी) दौरे असतात. संघटनांचे आंदोलने- मोर्चे, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका निघतात. तसेच, १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांची गर्दी होते.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या साऱ्या घटनांवर बारकाईने करडी नजर ठेवण्यासाठी ‘हायटेक रिझोलेशन्स’ चे ड्रोन कॅमेऱ्याची पोलिस आयुक्तालयास आवश्‍यकता भासणार आहे.

स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत दोन ड्रोन कॅमेरे शहर पोलिस आयुक्तालयासाठी उपलब्ध होणार असले तरी ते हायटेक रिझोलेशन्सचे असावेत, यासाठी पोलिस आयुक्तालयाने ‘स्मार्टसिटी’ नव्याने प्रस्ताव दिला आहे. ज्यामुळे गर्दीच्या ठिकाणी या ड्रोन कॅमेऱ्यातून करडी नजर ठेवणे शहर पोलिसांना शक्य होणार आहे. (Police commissionerate wants hightech drone new proposal to SmartCity nashik news)

स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यांचे नियंत्रण शहर पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडणी केली जाणार आहे.

याशिवाय, शहरात नेहमीच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे असतात. विविध संघटनांच्या माध्यमातून नेहमीच मोर्चे - आंदोलने होतात. सार्वजनिक गणेशोत्सवासह शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातून मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघतात.

याशिवाय आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होणार आहे. या साऱ्या घडामोडींवर बारकाईने करडी नजर ठेवण्यासाठी स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून दोन ड्रोन कॅमेरे शहर पोलिस आयुक्तालयास पुरविण्यात येणार आहेत.

या ड्रोन कॅमेऱ्यामुळे गर्दीवर नजर ठेवणे पोलिसांना शक्य होणार आहे. यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या वायरलेस विभागातील ७ ते ८ पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांसमोर ड्रोन कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

असे असले तरी, जे ड्रोन कॅमेरे पोलिस आयुक्तालयासाठी देण्यात आले. त्याला मर्यादा पडत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. या ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेल्या छायाचित्रांमध्ये अस्पष्टता अधिक आहे. गर्दीतील व्यक्तीचा चेहरा वा वाहनांचा क्रमांक स्पष्ट दिसत नाही.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

police commissionerate Nashik latest marathi news
Nashik ZP News: जलजीवनच्या कामांची बिले 8 दिवसातच मिळणार; CEOनी देयके काढण्याचे निश्चित केले वेळापत्रक

यासाठी किमान १०० मीटर उंचीवरून गर्दीतील व्यक्तींचा चेहरा वा वाहनांचा क्रमांक सुस्पष्ट दिसण्यासाठी हायटेक रिझोलेशन्स असलेले ड्रोन कॅमेऱ्याची आवश्‍यकता भासणार आहे. यासाठी पोलिस आयुक्तांनी ड्रोन कॅमेऱ्यातील त्रुटी ओळखून त्या स्मार्टसिटीच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

तसेच, हायटेक रिझोलेशन्स असलेले ड्रोन कॅमेऱ्याच्या मागणीसाठी नव्याने प्रस्ताव पोलिस आयुक्तालयातर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पाला देण्यात आला आहे.

यासाठी हवा हायटेक ड्रोन कॅमेरा

- गर्दीच्या ठिकाणची छायाचित्र सुस्पष्ट मिळण्यासाठी
- गर्दीतील संशयित व्यक्तींचा चेहरा स्पष्ट दिसावा
- संशयित वाहनाचा क्रमांक झूम केल्यानंतर स्पष्ट दिसावा
- गर्दीतील व्यक्तींचे चेहरे ओळखू यावेत वा ते पाहून त्यांचा शोध घेता यावा

"पोलिस बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चावर करडी नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे उपयुक्त ठरतील. परंतु ते हायटेक रिझोलेशन्स असलेले ड्रोन कॅमेरे असतील तरच त्याचा फायदा होऊ शकेल. त्यासाठी पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार स्मार्टसिटीकडे नव्याने प्रस्ताव देण्यात आला असून दोन हायटेक रिझोलेशन्स ड्रोन कॅमेऱ्याची मागणी केली आहे."
- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.

police commissionerate Nashik latest marathi news
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाचा हा टप्पा देखील पूर्णत्वाकडे

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com