Nashik: पोलिसांकडूनच अन्याय होतोय? नागरिकांनो, वाचा फोडण्यासाठी पोलीस प्राधिकरणाकडे करा तक्रार...

police beating
police beatingesakal

Nashik: आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाचा फुटावी, न्याय मिळावा म्हणून अनेकदा पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ नागरिकांवर येत असते. मात्र, काहीवेळा पोलीस ठाण्यातच कधी कधी आपल्यावर अन्याय होण्याची वेळ ओढावते. मग अशावेळी नेमका न्याय मागायचा तरी कुठे ? असा प्रश्न निश्चितपणाने पडतो.

त्यावेळी आपण पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार करु शकता. आपल्या न्याय व्यवस्थेने ही सोय नागरिकांसाठी केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता पोलीस प्राधिकरणाकडे आल्यास आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडता येऊ शकते. 

नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नवी मुंबई व पुणे येथे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण सुरू झाले आहेत. पोलिसांविरुद्धच्या तक्रारींसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापावे या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यान्वित करण्यात आले आहेत. (Police Complaints Authority has been operationalized to complain against police nashik news)

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपविभागीय अधिकारी या पदांपासून थेट पोलीस महासंचालक पदापर्यंतच्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबाबत तक्रारी करता येतात. पोलीस शिपाई ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या तक्रारी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालयात करता येतात.

केंद्र सरकारने पोलीस व्यवस्थेतील सुधारणांसाठी वेळोवेळी आयोग व समित्या नेमल्या होत्या. राष्ट्रीय पोलीस आयोग रिबेरा समिती, सोली सोराबजी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस कायदा मसुदा समिती हा त्याचाच एक भाग. पोलीस कायदा मसुदा समितीने प्रत्येक राज्यात राज्यस्तरीय व विभागस्तरीय पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण स्थापण्याची तरतूद २००६ मध्ये आदर्श पोलीस कायद्यात केली. विविध अहवालांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयानेही २२ सप्टेंबर २००६ रोजी प्रकाश सिंग व अन्य विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला.

पोलीस विभागात कायदा व सुव्यवस्था आणि गुन्ह्यांचा तपास असे दोन वेगळे विभाग असावेत. तसेच नागरिकांच्या पोलिसांविरुद्धच्या तक्रारीसाठी स्वतंत्र प्राधिकरण करावे, असे निर्देश दिले. पोलिसांनी आपले कर्तव्य जबाबदारीपूर्वक व कायद्याला अनुसरून पार पाडावे आणि प्रत्येक कृती कायद्याला धरूनच करावी, हा उद्देश त्यामागे होता.

गृह विभागाने २५ जुलै २००८ रोजी राज्य व विभागस्तरीय पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने प्राधिकरणांच्या स्थापनेसाठी २५ जून २०१४ रोजी महाराष्ट्र पोलीस कायद्यात सुधारणा केली. दरम्यान २०१४ च्या एका फौजदारी रिट याचिकेच्या निमित्ताने हा विषय पुन्हा एकदा उच्च न्यायालयासमोर आला.

police beating
Maharashtra ZP School: राज्यात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश; शिक्षण विभागाचा निर्णय

तेव्हा शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन राज्यस्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यान्वित केले. प्राधिकरणाने दिलेला निकाल, तक्रारदाराला अमान्य असल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

कोणत्याही पोलिसांविरुद्ध गंभीर आरोप किंवा तक्रार आली तर प्राधिकरण स्वतःहून त्याविषयी चौकशी करू शकते, अशी प्रकरणे सरकारकडून प्राधिकरणाकडे सोपवली जाऊ शकतात. त्याचबरोबर पीडित व्यक्ती अथवा त्यांच्या वतीने कुटुंबीय किंवा साथीदाराकडून, एखाद्या प्रत्यक्षदर्शीकडून, पोलीस विभाग किंवा राष्ट्रीय वा राज्य मानवाधिकार आयोगासारख्या विविध मंचांकडूनही प्राधिकरणासमोर तक्रार मांडली जाऊ शकते.

चौकशीत पोलिसाने गैरकृत्य केल्याचे निष्पन्न झाले तर प्राधिकरण संबंधित पोलिसांविरुद्ध विभागीय शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करू शकते. कायद्याचे उल्लंघन करून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले तर प्राधिकरण त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची शिफारस करू शकते. प्रसंगी पीडित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याची शिफारसही राज्य सरकारला करू शकते.

तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी संबंधित साक्षीदारांना बोलावण्याचे अधिकार

दिवाणी न्यायालयाप्रमाणे या प्राधिकरणालाही आहेत. तसेच पुरावे म्हणून सरकारी कागदपत्रे मिळवणे, प्रतिज्ञापत्रावर पुरावे गोळा करणे आदी अधिकारही प्राधिकरणाला प्राप्त झालेले आहेत. आवश्यकता भासल्यास तक्रारदाराला संरक्षण देण्याचे निर्देशही प्राधिकरण सरकारला देऊ शकते.

police beating
Nashik News: हरवलेलं नात गवसले, पण दीड वर्षांनंतर... नातवाने शोधली वर्षापूर्वी हरवलेली आजी

पोलिसांविरुद्ध या प्रकरणांत करता येईल तक्रार 

१) आरोपीचा कोठडीत मृत्यू होणे

२) पोलिसांनी गंभीर दुखापत करणे

३) पोलिसाने बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न करणे

४) पोलिसाने भ्रष्टाचार करणे

५) पोलिसाने खंडणी मागणे

६) पोलिसाने जमीन, घर बळकावण्यास मदत करणे

७) पोलिसाने नागरिकास विनाकारण कैदेत / स्थानबद्ध करणे

८) पोलिसाने कायद्याचे उल्लंघन करणे / अधिकाराचा दुरूपयोग करणे

येथे साधा संपर्क

उमाकांत मिटकरी, न्यायिक सदस्य, पोलीस प्राधिकरण

दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे रोडवरील, कूपरेज एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज इमारतीत, चौथ्या मजल्यावर, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे कार्यालय आहे.

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८२००४५, ४६, ४७ 

ई-मेल mahaspca@gmail.com असा आहे.

पत्ता ः-  माजी न्यायमूर्ती श्रीहरी डावरे व उमाकांत मिटकर यांच्या न्यायपीठासमोर या तक्रारी चालतात.

police beating
Nashik News: दारणा पाणीयोजनेची पाईपलाईन फुटली; 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com