esakal | पोलिस विभाग बदली : धुळे, नंदुरबार, नाशिक ग्रामीणला 'यांची' बदली
sakal

बोलून बातमी शोधा

police

पोलिस विभाग बदली : धुळे जि. पोलिस अधीक्षकपदी प्रवीण पाटील

sakal_logo
By
प्रशांत कोतकर

नाशिक : गृह विभागाने (home ministry) बहुप्रतिक्षेत असलेल्या राज्यातील जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त, अपर पोलिस अधीक्षक व पोलिस उपअधीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश गणेशोत्सवाच्या (ganesh festival) पूर्वसंध्येला काढले. यात नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. धुळ्याचे अधीक्षक चिन्मय पंडित यांची नागपूर शहर पोलिस उपायुक्त, तर नंदुरबारचे महेंद्र पंडित कमलाकर यांची पोलिस उपायुक्त, मुंबई शहर येथे बदली झाली आहे. धुळे येथे खानदेशपुत्र प्रवीण सी. पाटील, तर नंदुरबार येथे पी. आर. पाटील यांची अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

हेही वाचा: नाशिक : भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत बाजार समिती कर्मचारी बडतर्फ

नंदुरबारला प्रवीण आर. पाटील, तर नाशिक ग्रामीणला शहाजी उमाप
अपर पोलिस अधीक्षकांमध्ये नाशिक ग्रामीणच्या शर्मिला घार्गे यांची औरंगाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी नागरी हक्क संरक्षणच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार यांची बदली झाली आहे. चाळीसगाव (जि. जळगाव) चे अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांची पोलिस अकादमीत, तर राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त रमेश चोपडे यांची चाळीसगावला बदली झाली आहे. श्रीरामपूर (अहमदनगर)च्या अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, नागपूर राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्त अनिता पाटील यांची पोलिस अकादमीत पोलिस अधीक्षकपदी बदली झाली. मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अकबर इलाही पठाण यांची नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

हेही वाचा: नांदगावचे जनजीवन पूर्वपदावर; प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान


तसेच राज्यातील ९२ पोलिस उपअधीक्षक व सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या आज बदल्या झाल्या. यात नाशिक शहरचे सहाय्यक आयुक्त समीर शेख यांची बृहन्मुंबई सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बदली झाली. उर्वरित बदली झालेले व येणारे अधिकारी असे : नीलेश सोनवणे (अपर पोलिस अधीक्षक एसीबी- सहाय्यक पोलिस आयुक्त ठाणे शहर), शशिकांत शिंदे (मालेगाव ग्रामीण- कोल्हापूर), पुष्कराज सूर्यवंशी- (नंदुरबार- मालेगाव ग्रामीण), सुभाष कांबळे (पोलिस अकादमी- पुणे), कविता फडतरे (मोर्शी जि. अमरावती- पेठ जि. नाशिक), विश्‍वास वळवी (बोईसर, जि. पालघर- नंदुरबार), कुणाल सोनवणे (भामरागड, जि. गडचिरोली- फैजपूर, जि. जळगाव), संदीप गावित (गंगापूर, जि. औरंगाबाद- जळगाव), अनिल पोवार (ठाणे शहर- पोलिस अकादमी), अविनाश धर्माधिकारी (बृहन्मुंबई- पोलिस अकादमी), नरसिंग यादव (सहाय्यक पोलिस आयुक्त बृहन्मुंबई- पोलिस अकादमी, नाशिक), सिद्धेश्‍वर धुमाळ (बिलोली जि.नांदेड-नाशिक शहर).


धुळ्याचे एसपी प्रवीण पाटील
धुळे : जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांची गुरुवारी नागपूर येथे पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांच्या जागी नवी मुंबईतील गुन्हे शाखा विभागाचे उपायुक्त प्रवीण चुडामण पाटील यांची नियुक्ती झाली. ते कावपिप्री (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील रहिवासी असून, त्यांचे धुळ्यातीलच कृषी महाविद्यालयात शिक्षण झाले आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये गणेश मंडळांना शुल्क माफी; जाहिरात शुल्क मात्र कायमनंदुरबारला पोलिस अधीक्षकपदी
पी. आर. पाटील यांची नियुक्‍ती

नंदुरबार : येथील पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई शहर पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांच्याजागी कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षणचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नंदुरबार येथे दोन वर्षांपूर्वी कार्यभार घेतला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले. दोन वर्षात गुन्हेगारांमध्ये खाकीचा दरारा निर्माण करण्यात महेंद्र पंडित यशस्वी झाले होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात एक यशस्वी अधिकारी म्हणून त्यांनी आपली छाप जिल्ह्यात निर्माण केली होती.

loading image
go to top