Nashik News: पडक्या घरांमध्ये पोलिस कुटुंबीयांचा निवास; 50 टक्के खोल्या बंद

police families living in abandoned house nashik news
police families living in abandoned house nashik newsesakal

Nashik News : सुमारे २५ लाख नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या जवळपास तीन हजार पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना चांगले, सुस्थितीतील सरकारी घर नाही. गंगापूर रोडवरील पोलिस मुख्यालयाच्या आवारातील पडक्या, धोकादायक घरांमध्ये पोलिसांच्या कुटुंबीयांना जीवमुठीत धरून राहावे लागते आहे.

तर, दुसरीकडे सहा वर्षापासून शासनदरबारी १२ मजली इमारतीची ‘फाइल’ लालफितीत अडकली आहे. (police families living in abandoned house nashik news)

मुख्यालयातील असलेल्या घरांमध्ये ४० टक्के कर्मचारी राहण्यास असून, उर्वरित ६० टक्के घरे राहण्यायोग्य नसल्याने व त्यांची दुरुस्तीही शक्य नसल्याने पडीक आहेत. जे राहत आहेत तेही नाइलाजास्तव राहत असून, त्यांना कोणाकडे दाद मागण्याचीही सोय नसल्याने कोणीही त्यांच्या घरांचा प्रश्न शासनदरबारी आग्रहाने मांडतही नाही.

गंगापूर रोडवर शहर पोलिस आयुक्तालय आहे. आयुक्तालयाच्या बाजूलाच मुख्यालय आवारात पोलिस वसाहत आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी निवासाकरिता स्वातंत्र्यपूर्व काळापासून कौलारू बैठ्या स्वरूपाच्या १४ चाळी आहेत. याशिवाय, १९७५ च्या दरम्यान इमारती उभारल्या होत्या. त्याचप्रमाणे २००३ मध्ये नवीन इमारती बांधण्यात आल्या.

यातील कौलारू चाळीचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील ४८७ खोल्यांपैकी २४० खोल्यांमध्ये पोलिस कुटुंबीय राहतात. तर, २४७ खोल्या राहण्यायोग्य नसल्याने त्या बंद आहेत. अशीच स्थिती जुन्या इमारतींची असून, १७२ घरांपैकी १३५ खोल्या राहण्यायोग्य नाहीत. तर नवीन इमारतीतील केवळ १० खोल्या बंद असल्या तरी तेथील समस्या अनेक आहेत.

पडीक खोल्या अधिक असल्याने त्या ठिकाणी गाजरगवत वाढलेले आहे. मोडकळीस आलेल्या खोल्यांची कौल पडली आहेत, काही घरे धोकादायक झाली असून ते कधीही कोसळू शकतात. याबाबत पोलिस प्रशासनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला जातो, परंतु त्या विभागाकडून दुर्लक्ष केले जाते.

police families living in abandoned house nashik news
Nashik News: दिव्यांग भवनाचे रात्रीतून उरकले उद्‍घाटन; जिल्हा परिषदेसह शासकीय यंत्रणा अनभिज्ञ

कौले काढून पत्र्यांचा वापर

बैठ्या चाळीतील सुस्थितीत व राहण्यायोग्य खोल्यांची कौल काढून त्याजागी पत्रे टाकण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी पावसाळ्यात घरे गळकी असल्याने कौलावर ताडपत्री अंथरण्यात आली आहे. असे असले तरी काही कुटुंबीय जीव मुठीत धरून या घरांमध्ये राहत आहेत. जुन्या इमारतींना तडे गेले असून खिडक्यांची तावदाने तुटली आहेत.

काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. २०१८ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मुख्यालयातील बैठ्या चाळी पाडून त्याऐवजी १२ मजली बहुमजली चार इमारती उभारून त्यातून १ हजार १५९ वन बीएचके घरांचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे दिला आहे.

महामंडळाकडून सदर प्रस्ताव गृहविभागाकडेही पाठविला आहे. परंतु अद्यापही या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने पोलिस घरे शासनाच्या लालफिती कारभारात अडकून पडला आहे. यासंदर्भात २०२० च्या अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, परंतु ती केवळ चर्चाच राहिली.

''मुख्यालयातील पोलिस वसाहतींतील घरांची दुरुस्ती आयुक्तालयाच्या मर्यादित खर्चातून केला जातो. नवीन इमारतीचा प्रस्ताव पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे पाठविलेला आहे. वारंवार पाठपुरावा आयुक्तामार्फत सुरू आहे.'' - चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, मुख्यालय.

मुख्यालयातील घरांची आकडेवारी

घरांचा प्रकार ..........एकूण घरे.......वाटप घरे........राहण्यास अयोग्य

बैठ्या चाळी.............४८७............२२०...............४४७

जुनी इमारत ............८४..............३४.................४५

जुनी इमारत.............८८..............५...................७९

नवीन इमारत...........१२८............११८................१०

police families living in abandoned house nashik news
Nashik News: जिल्ह्यात चार तालुक्यांना 13 जानेवारीपर्यंत दोन तास वीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com