#Lockdown : भुकेलेल्या किशोरला वर्दीच्या रूपात जणू अन्नदाताच भेटला!

police helps beggers.png
police helps beggers.png
Updated on

नाशिक / कळवण : पोलिस म्हटले, की खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती, अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. मात्र, देशभरात लॉकडाउन सुरू असल्याने खाकी वर्दीतील माणुसकीचा चेहरा समोर आला. गेल्या तीन दिवसांपासून लॉकडाउनमुळे अडगळीत पडलेल्या अपंगाच्या मदतीला येथील पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ धावून गेले. भुखी असलेल्या किशोर नामक व्यक्तीला वर्दीच्या रूपात जणू अन्नदाताच भेटला. 

कळवणला खाकी वर्दीतही माणुसकीचा चेहरा 
देवळा रोडवरील पेट्रोलपंपाजवळ बंद दुकानाच्या आडोशाला तीनचाकी सायकलवर मालेगाव येथील किशोर नामक व्यक्ती अडकून पडला होता. लॉकडाउनमुळे रस्ते ओस पडले. दुकाने बंद, आजूबाजूला कोणी ओळखत नाही, कोणाशी ओळख नाही, अशा परिस्थिती किशोर सायकलीसोबत दुकानाजवळ तीन दिवसांपासून अन्न-पाण्याविना बसून होता. कळवण शहरात पेट्रोलिंग करताना पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या निदर्शनास अपंग किशोर आला. त्याची विचारपूस केली असता, तो तीन दिवसांपासून भुखी असल्याचे त्याच्या बोलण्यातून समजले.

त्या व्यक्तीला जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून पोलिस निरीक्षक वाघ पेट्रोलिंगला निघून गेले. पोलिस अधिकाऱ्याला कर्तव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागते. असे असले, तरी वर्दीतही मनुष्य असतो. त्यालाही मन, भावना असतात. ड्यूटीसाठी कठोर बनलेला वर्दीतील माणूस वेळप्रसंगी मनाने तितकाच मृदू होतो. अशाच खाकी वर्दीत दडलेल्या या अधिकाऱ्याने दिवसभर बंदोबस्ताचा ताण असतानाही अपंगाची भूख- तहान भागविली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com