esakal | मृत्यूची माहिती पोलिसांना कळवा; रुग्णालयावरील हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना

बोलून बातमी शोधा

nashik police SP
मृत्यूची माहिती पोलिसांना कळवा; रुग्णालयावरील हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : रुग्णांच्या नातेवाइकांकडून थेट हॉस्पिटल आणि डॉक्टरवर हल्ले सुरू झाले आहेत. हल्ले टाळण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नियमावली जाहीर केली असून, यापुढे कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित हॉस्पिटलने ती माहिती लेखी स्वरूपात जवळच्या पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सवर हल्ले वाढलेत

रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाला किंवा प्रकृती खालावल्यास त्यांचे नातेवाईक व इतर समाजकंटकांकडून डॉक्टरवर हल्ले होतात. याप्रकरणी हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन नाशिकने संरक्षणाची मागणी केल्याने डॉक्टर व रुग्णालयावर होणारे हल्ले रोखण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींची गुरुवारी (ता. २९) पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी कोरोना मृत्यू झाल्यास रुग्णालयांनी त्या त्या भागातील पोलिस ठाण्यात माहिती कळविण्याचे आदेश काढले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीयव्यवस्था यंत्रणा कोलमडली आहे. रुग्णांना उपचार मिळणे सहज शक्य होत नसल्याने रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले. मात्र, यामुळे थेट हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले.

हेही वाचा: दिंडोरीतील फुलशेती सलाइनवर! यंदाही हरपला गुलाबाचा टवटवीतपणा

मृत्यूची माहिती पोलिसांना कळवा

शहरात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने लागलीच ही माहिती जवळच्या पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना कळवयाची आहे. पोलिस निरीक्षकाने चौकशी करून हल्ला होण्याची शक्यता असल्यास लागलीच पुढील कार्यवाही करायची आहे. यामुळे हॉस्पिटल आणि पोलिस निरीक्षकांचे काम वाढणार असले तरी हल्ल्यासारख्या धक्कादायक घटना रोखण्यात यश मिळू शकते. हद्दीतील विविध समाजाची, नागरिकांची, त्यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य घटनांची कल्पना पोलिस निरीक्षकांना येऊ शकते आणि पुढील घटनांना पायबंद घालता येऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जाते आहे.

हेही वाचा: दुर्दैवी : शववाहिकेचे नाममात्र शुल्क असताना उकळतात बक्कळ पैसे