esakal | दुर्दैवी : शववाहिकेचे नाममात्र शुल्क असताना उकळतात बक्कळ पैसे

बोलून बातमी शोधा

charged more money to transport dead body in shav vahika

दुर्दैवी : शववाहिकेचे नाममात्र शुल्क असताना उकळतात बक्कळ पैसे

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेतर्फे मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जात असताना अंत्यसंस्कार करताना तीन ते चार हजार रुपये घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतरही मृतांच्या नातेवाइकांकडून आर्थिक लूट सुरूच आहे. महापालिकेकडून शववाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शववाहिकेचे नाममात्र शुल्क आकारले जात असताना आता घर ते स्मशानभूमीच्या प्रवासासाठी नातेवाइकांकडून बक्कळ पैसे उकळले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

७५ रुपये घेण्याऐवजी घेतले दीड हजार रुपये

कोरोनाबाधितांसह नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर मोफत अंत्यसंस्काराबरोबरच शववाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंचवटी विभागातील तारवालानगर भागात शांताबाई डोलनर यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी शववाहिका मागवण्यात आली. शववाहिका विलंबाने आल्यानंतरही नातेवाइकांनी वाद टाळत शववाहिकेतून मृतदेह नेला. परंतु शववाहिकेचे ७५ रुपये घेण्याऐवजी दीड हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अमोल जगळे यांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा आहे. ऑक्सिजन बेड मिळाला, तर ऑक्सिजन मिळत नाही, ऑक्सिजन मिळाला, तर रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागते. अशा एक ना अनेक समस्या असताना अंत्यसंस्कारासाठी मोफत सुविधा असताना पैसे आकारले जातात. आता शववाहिकेच्या माध्यमातून नवीन लूट सुरू झाल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांकडून कारवाईची मागणी होत आहे.

हेही वाचा: देवरूपी माणूस! स्वखर्चाने गरजूंना घरपोच 'प्राणवायू' देऊन जीवनदान

हेही वाचा: रुग्ण अन् नातेवाइकांचा तो टाहो.. घटनेची आठवण होताच अजूनही चुकतो काळजाचा ठोका..