पक्षांसाठी धावली खाकी; कृत्रिम घरट्यांसह केली दाणापाण्याची सोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police provided water and food for the birds

पक्षांसाठी धावली खाकी; कृत्रिम घरट्यांसह केली दाणापाण्याची सोय

अंबासन (जि. नाशिक) : खाकी वर्दीतही संवेदनशील माणूस दडलेला असतो. एका खाकी वर्दीतील माणसाच्या संकल्पनेतून पोलिस ठाण्याच्या आवारात पक्षांना हक्काचे घरटे आणि दाणापाण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून जनतेचे रक्षक हे निसर्ग आणि 'पर्यावरणाचे रक्षक' अशी ओळख निर्माण केली आहे.

जायखेडा (ता.बागलाण) येथील पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी मुल्हेर, ताहाराबाद आऊटपोस्ट तसेच जायखेडा पोलिस ठाण्यातील आवारात जागोजागी झाडांच्या फांदीवर कृत्रिम घरटी आणि दाणापाणीची सोय केली आहे. श्री. रसाळ यांच्या संकल्पनेतुन सुरू केलेल्या 'पक्षी वाचवा' अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. पोलिस ठाण्याच्या आवारात नेहमीच पक्षांचा किलबिलाट सुरू असतो. सध्या उन्हाचा प्रकोप वाढतच चालल्याने पक्षांनाही दाणा पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या प्रेरणेतून उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी पक्षांसाठी कृत्रिम घरटे तयार करण्यासाठी दुकानातील टाकाऊ तुप व तेलाच्या पत्र्याचे डब्बे गोळा करून त्याला चारही बाजूने आकार देऊन त्यात पक्षांसाठी दाणापाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. या कृत्रिम घरटे झाडावर बसविताच अनेक पक्षी तहान भागविण्यासाठी वावर हळूहळू वाढू लागला असून टोकदार चोचीतून दाणे टिपतानाही दिसून येत आहेत. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

हेही वाचा: मका पिकांत रानडुक्करांचा धुमाकूळ; अर्धा एकर क्षेत्र उध्वस्त

''सध्या वाढत्या उन्हामुळे सर्वानाच त्रास जाणवत आहे. यात पक्षांनीही असह्य झाले असून कृत्रिम घरटे तयार करून पक्षी वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.'' - नवनाथ रसाळ, उपनिरीक्षक जायखेडा.

''माणसाप्रमाणेच पक्षांना उन्हाची चटके सहन करावे लागतात. कावळा, चिमणी यांसारखे पक्षी दुर्मीळ होत चालले आहेत. पक्षी संवर्धन व्हावे या हेतूनेच हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहेत.'' - श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक जायखेडा.

हेही वाचा: 'विज्ञानाचा' उपयोग शेती व्यवसायात करावा

Web Title: Police Provided Water And Food For The Birds Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top