पोलिस भरती परीक्षा : तरूणाची विषारी औषध घेऊन आत्महत्या | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police recruitment

पोलिस भरती परीक्षा : तरूणाची विषारी औषध घेऊन आत्महत्या | Nashik

सिडको (नाशिक) : पोलिस भरती परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिस भरती परीक्षा : तरूणाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

राहुल भानुदास चौगुले (वय २२, रा. एक्सलो पॉइंट, अंबड) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने मागील आठवड्यातच पोलिस भरतीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा ऑनलाइन निकाल बघितला असता, त्याला कमी मार्क्स मिळाल्याने तो अनुत्तीर्ण झाल्याचे लक्षात आल्याने त्याने शनिवारी (ता. २०) रात्री साडेनऊच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. त्रास होऊ लागल्याने त्याचे वडील भानुदास चौगुले यांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी (ता. २१) सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: नाशिक : रखडलेल्या कामांमुळे स्थानिकांना मनस्ताप

हेही वाचा: महापौरपदाची द्विवार्षिक पूर्ती; दोन वर्षांत शहर समृद्धीच्या वाटेवर

loading image
go to top