नाशिक : चोरलेल्या ४ गायींची भूल देऊन कत्तल; महिनाभरात तिसरी घटना

Police registered a case for killing 4 cows stolen from a cowshed at Belgaon Kurhe
Police registered a case for killing 4 cows stolen from a cowshed at Belgaon Kurhe


अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : गोठ्यात बांधलेल्या पाच गाई सोडून नेत चार गायींची कत्तल करण्यात आल्याची संतापदायक घटना बेलगाव कुऱ्हे येथे बुधवारी (ता. १९) पहाटे पाचला घडली. या घटनेत एक गाय बेशुद्धावस्थेत सापडली आहे. येथील दुग्धव्यावसायिक संदीप गेणु गुळवे असे पशुपालकाचे नाव असून, वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र, पशुपालकांनी पोलिसांना घेराव घातल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.

पशुपालक गुळवे यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या गोठ्यात सर्व गायी बांधलेल्या होत्या. पहाटे गायींना चारा टाकण्यासाठी ते उठले असता त्यांना काही संशयास्पद हालचाली व कुजबुज करण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर ते बाहेर आले. त्यावेळी गायींचे मांस, डोक्याची शिंगे व पायांचे अवशेष इतरत्र पडलेले व उग्रवास आला. हे सर्व पाहून त्यांना भोवळ आली. त्यांना पाहून चोरट्यांनी कोयता, भूल दिलेल्या इंजेक्शनचे रिकामे शिरिंज, एका गायीचे प्लास्टिकच्या पिशवीत पॅकिंग केलेले मांस व भूल दिलेली जीवंत गाय तशाच अवस्थेत टाकून पळ काढला. तेवढ्यात स्वतःला कसेबसे सांभाळत त्यांनी आरडाओरडा करीत गावातील लोकांना जमा केले.

जमिनीवर पडलेला रक्ताचा सडा, छिन्न- विच्छिन्न अवस्थेत पडलेले गायींच्या शरीराचे अवशेष, गाभण गायींच्या पोटातील चार- सहा महिन्यांची रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वासरांचे दोन अभ्रके सर्व पाहून जीवाचा थरकाप होणारी व तितकाच संतापदायक प्रकार पाहून ग्रामस्थ आक्रमक झाले.

माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर गायींचे अवशेष व मांस जमिनीत मातीआड केले. मात्र, गुन्हा दाखल करण्यात कसूर करीत असताना पशुपालकांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. या वेळी ॲड. संदीप गुळवे, राजाभाऊ नाठे, अंबादास धोंगडे, संतोष गुळवे, कैलास कर्पे, शिरपत गुळवे, शंकर गुळवे, कैलास गुळवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Police registered a case for killing 4 cows stolen from a cowshed at Belgaon Kurhe
नाशिक : शेतातून करा ऑफिसचं काम, नोकरदारांसाठी अनोखी सुविधा

पहाटेच्या सुमारास गोठ्यातील गायींना भुलीचे इंजेक्शन देवून कत्तल केली जाते. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या आधीही अशा अनेक घटना घडल्या असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि गुन्हेगारांना तत्काळ अटक कटावी.
- संतोष गुळवे, माजी सरपंच, बेलगाव कुऱ्हे

Police registered a case for killing 4 cows stolen from a cowshed at Belgaon Kurhe
कोरोना लसीपासून मिळालेली इम्युनिटी किती काळ राहाते? संशोधनातून खुलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com