कोरोनाच्या तणावात पोलीसांची भारी कामगिरी! बेपत्ता दोन मुलींची घडवली आई-वडिलांशी भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

कोरोनाच्या तणावात पोलीसांची भारी कामगिरी! बेपत्ता दोन मुलींची घडवली आई-वडिलांशी भेट

नाशिक रोड : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींना वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे व सहकाऱ्यांनी शोधून काढले. कोरोना काळातील बंदोबस्त, नाकाबंदी व इतर ताण- तणावातून वेळ काढून पोलिसांनी मुलीचा शोध घेतला व सुखरूप आई- वडिलांच्या ताब्यात दिले. अशा दोन घटना घडल्या.

कोरोना काळातील ताण-तणावात बेपत्ता दोन मुलीचा पोलिसांकडून शोध

पहिल्या घटनेत आर्टिलरी सेंटररोडवर राहणारी १४ वर्षाची मुलगी हरवली होती. तिच्या आईने २० एप्रिलला उपनगर पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. १९ एप्रिलला रात्री घराजवळील साईकिरण दुकानातून काडेपेटी घेऊ येते, असे सांगून मुलगी घराबाहेर पडली होती. तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले, असे तक्रारीत म्हटले होते. मुलीस फूस पळवून नेल्याचा गुन्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल केला होता. पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, पोलिस कर्मचारी गायकवाड, बहिरट आदींचे पथक तयार करण्यात आले होते. ही मुलगी मुंबई नाका येथील रुग्णालयात असल्याचे समजले पोलिस तेथे गेल्यावर ही मुलगी जत्रा हॉटेलसमोरील अपार्टमेंटमध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले. नंतर पालकांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा: 5 वेळा हृदयविकाराचा झटका, मधुमेह असूनही 92 वर्षीय आजोबांचा लढा यशस्वी!

उपनगर पोलिसांनी केले आई-वडिलांच्या स्वाधिन

दुस-या घटनेत जयभवानीरोडवरील पंधरा वर्षाची मुलगी बेपत्ता होती. तिचे पालक पंचवटीत देवदर्शनासाठी गेले होते. घरी परतल्यावर आपली मुलगी त्यांना दिसली नाही. शोध घेऊनही ती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली होती. पोलिस कर्मचारी गणपत काकड, मधुकर दावले आदींनी शोध घेतला असता ही मुलगी भिवंडी बसस्थानकावर असल्याचे समजले. तेथे जाऊन तिला पोलिसांनी आणले. नंतर पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा: भाजप नगरसेविकेच्या भावाचा कोरोनाने मृत्यू; समर्थकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड

Web Title: Police Search For Two Missing Girls Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :police
go to top