लॉकडाऊनमध्ये पर्यटनाकरीता किल्ल्यावर जाताय.. मग हे वाचाच..कारण ही मौजमजा अनेकांना चांगलीच भोवली

ankai
ankai

नाशिक / येवला : लॉकडाउनमुळे देशातील राज्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवली आहे. यामुळे चार महिन्यापासून पर्यटनक्षेत्र सुनेसुने पडले आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने सर्वत्र हिरवाई पसरली आहे. यामुळे अनेक जणांची पावले आपोआप पर्यटन स्थळांकडे वळणार आहे. मात्र लॉकडाऊन यास आडवा येत आहे. असे असतांना देखील रविवारी येवला तालुक्‍यातील अनकाई किल्ल्यावर मौजमजा करण्यास गेले. मात्र त्यानंतर ती मजा त्यांना चांगलीच भोवली आहे..काय घडले नेमके?

किल्लावरची मौजमजा चांगलीच भोवली

पावसाळा सुरू झाला, की अनकाई किल्ला परिसर हिरवळीने नटून जातो. हिरवळीने नटलेला हा किल्ला पूर्ण पावसाळा भाविक व पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातो. आता लॉकडाउनमध्ये बंदी असतानाही रविवारी येवला, मनमाड, नांदगाव, वैजापूर, संगमनेर आदी ठिकाणांहून अनेक पर्यटक किल्ल्यावर आले. यामुळे परिसरात गर्दी झाली. किल्ला परिसरात गर्दी झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र याची भनक पोलिसांना लागताच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याने या सर्वांना लॉकडाऊनमध्ये किल्लावरची मौजमजा मात्र या सर्वांना चांगलीच भोवली आहे. पोलिसांनी या परिसरात येणाऱ्या 32 जणांवर दंडात्मक कारवाई केली.

पोलिसांकडून उठाबशांसह दंडात्मक कारवाई​
पोलिसांनी देखील तत्काळ या घटनेची दखल घेत याठिकाणी पोहचून 32 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यासह दिवसभर विनापरवाना येणाऱ्यांनाही पोलिसी खाक्‍या पाहावयास मिळाला. या वेळी खिशाला झळ बसतानाच काहींना तर उठाबशा काढण्याची शिक्षा पोलिसांनी केली व तंबीही दिली. मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे यांनीदेखील येथे येऊन या हौशी पर्यटकांची कानउघडणी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे, उज्ज्वलसिंग राजपूत, वाहतूक पोलिस एच. डी. पवार, भालके, होमगार्ड माळी, मुलाणी, करवर, देवकर आदींसह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com