Police Transfer : सातपूर वरिष्ठ पीआय चव्हाण यांच्यासह घोटेकरांची बदली

Transfer
Transfer esakal

सातपूर (जि. नाशिक) : सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण आणि क्राईम सहाय्यक निरीक्षक सतीश घोटेकर यांच्या कार्यशैलीची गंभीर दखल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेत तडकाफडकी बदली केली आहे. सातपूर पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कारभार तूर्तास राजू पठाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. (Police Transfer Transfer of police including Satpur senior PI Chavan from satpur nashik News)

अचानक झालेल्या या बदलीबाबत पोलिस वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून सातपूर पोलिस ठाणे विविध घटनांनी चर्चेला येत होते. अशोकनगर येथील अवैध सावकारीबाबत पोलिस आयुक्त आणि सहकार विभागाच्या निर्दशाने कारवाईला गेलेल्या पथकातील पोलिसाला संबंधित सावकाराने धमकी दिली.

त्यानंतर संबंधित पोलिस सातपूर ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला असता त्याची तक्रार न घेता उलट त्याला आयुक्ताकडे जा असे सांगण्यात आले होते. या प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली होती.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Transfer
Nashik Crime News : पिस्तुलीचा धाक दाखवून लुट करणारे तिघे जेरबंद; संशयितांमध्ये दोघे अल्पवयीन

दुसरीकडे वर्षभरात सातपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून यातच विविध गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांबरोबर अनेक कार्यक्रमात फोटोसेशन करत सोशल मीडियावर टाकले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवत नव्हते. औद्योगिक वसाहतीमध्ये वाढत्या गुन्हेगारीला पोलिस आळा घालू शकले नाही. टपऱ्यांच्या शेडमध्ये सर्रास अवैद्य दारू विक्री असून परिसरातील कित्येक मोठ्या चोरीचे विशेषतः पपया नर्सरीजवळील भगवानगड बंगल्यासह सुमारे अर्धा डझन दरोडे व घरफोडीच्या घटनांचा आजपर्यंत तपास लागू शकलेला नाही. यासह विविध घटनांमुळे आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

Transfer
Nashik Traffic News : शहरात सिग्नल यंत्रणा ठरतेय कुचकामी; लाल दिवा असूनही दुचाकी अन् चारचाकी सुसाट!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com