esakal | अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने 'राजकीय नेत्याला' चोप; चर्चेला उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

crime

नाशिक : छेड काढल्यामुळे राजकीय नेत्याला चोप; Video व्हायरल

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : येथे एका राजकीय पक्षाचा नेता व एका करिअर ॲकॅडमीचा संचालक असणाऱ्या नेत्याची महिलेचा मार खाताना चित्रफीत सोशल मीडियावर (social media) वाऱ्यासारखी व्हायरल होत असून, विविध चर्चांना उधाण आले आहे.

मार खातानाचा व्हिडिओ व्हायरल; चर्चेला उधाण

या राजकीय पक्षाच्या नेत्याने एक करिअर ॲकॅडमी चालवण्यास घेतली आहे. या ॲकॅडमीमध्ये मुलींना करिअर करायचे म्हणून त्या प्रवेशासाठी येत असतात. मात्र, मुलींच्या भोळेपणाचा फायदा घेऊन या राजकीय पक्षाच्या नेत्याने मुलींना अश्लील बोलणे, मद्यसेवनासाठी बोलावणे, त्याचप्रमाणे पोलिस व्हायचे असेल तर माझ्याबरोबर मुक्कामी राहावे लागेल, अशा तक्रारी होत्या. यासह अल्पवयीन मुलींना अश्लील बोलणे या कारणांमुळे या राजकीय पक्षाच्या नेत्याला महिलेचा मार खावा लागला आहे. बेअब्रू होऊ नये म्हणून मुलींनी पोलिस दप्तरी तक्रार देणे टाळले होते. मुलींनी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेकडे त्याची तक्रार केली होती. हा राजकीय पक्षाचा नेता नाशिक रोड येथील रहिवासी आहे. या महिलेचा मार खातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत असून, नाशिक रोडमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा: कृषी उत्पन्न बाजार समितीला पुन्हा मुदतवाढ

अल्पवयीन मुलींना अश्लील बोलणे

दरम्यान, हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी लोकांच्या भांडणात मध्यस्थी करणे, विविध नियमांचा धाक दाखवून लोकांकडून पैसे उकळणे अशी कामे करीत असल्याची ही चर्चा सध्या नाशिक रोडमध्ये होत आहे. या नेत्याला महिलेने चांगला चोप दिला आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ अशीच चर्चा लोकांमध्ये होत आहे.

हेही वाचा: आदिमायेच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासचा प्रशासनाचा घाट

loading image
go to top