Nashik : अखेर वाघाडीचा दूषित प्रवाह थांबला

waghadi gutter after cleaning
waghadi gutter after cleaningesakal

पंचवटी (जि. नाशिक) : गत आठवड्यापासून वाघाडी नाल्यातील दूषित पाणी (Polluted Water) गोदापात्रात मिसळत होते. परंतु, ‘सकाळ’ च्या वृत्ताची दखल घेत महापालिकेतर्फे (nmc) वाघाडी नाल्याची स्वच्छता (Cleanliness Drive) करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. (polluted flow of Waghadi stopped by after nmc work Nashik news)

गत आठवड्यात तासभर झालेल्या जोरदार पावसानंतर वाघाडी नाल्यातील दूषित पाणी थेट गोदापात्रात मिसळत होते. त्यामुळे रस्त्यावरही दुर्गंधी पसरल्याने जाणारा येणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत ‘सकाळ’ ने पाठपुरावा केला असता, महापालिकेच्या स्वच्छता विभागाने तातडीने वाघाडी नाल्यातील कचरा काढल्यावर गोदावरीतील गटारीचा प्रवाह थांबला. मनपाचे विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय दरे यांच्यापर्यंत ही माहिती पोचताच त्यांनी मनुष्यबळ कामाला लावत हा प्रवाह थांबविला. मात्र, अद्यापही या नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा असून नाल्याची संपूर्ण स्वच्छता व्हावी, अशी मागणी आहे.

संपूर्ण स्वच्छता गरजेची

वाघाडी नाल्याचे गणेशवाडीच्या वरील भागात काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे तुलनेत या भागात गाळ नाही. परंतु गणेशवाडी भागात हे काँक्रिटीकरण झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासही झाले आहे. वाघाडीचे गाडगे महाराज पुलापर्यंत काँक्रिटीकरण झाल्यास ही समस्या दूर होऊ शकेल.

waghadi gutter after cleaning
Nashik Crime : पत्नीच्या मारेकऱ्याला 5 दिवसांची कोठडी

कचरा टाकणे सुरूच

वाघाडी नाल्याची काल काही प्रमाणात साफसफाई करण्यात आली. परंतु, त्यानंतर या भागात काही नागरिकांकडून कचरा टाकणे सुरूच आहे. नियमित घंटागाडी येऊनही नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांचे प्रबोधन व्हावे. यानंतरही असा प्रकार सुरूच राहिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा जागरूक नागरिकांनी केली आहे. तसेच, बुधवारच्या आठवडे बाजारानंतर सायंकाळी उरलेला माल वाघाडीत टाकणाऱ्या मासे विक्रेत्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी येथील स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.

waghadi gutter after cleaning
अतिक्रमणविरोधी पथक अन् व्यावसायिकांत पाठशिवणीचा खेळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com