lasalgaon market committee latest marathi news
lasalgaon market committee latest marathi newsesakal

Nashik : लासलगाव बाजार समितीत 18 पासून डाळींब लिलाव

Published on

लासलगाव (जि. नाशिक) : येथील बाजार समितीच्या (Market Committee) मुख्य बाजार आवारावर सोमवारपासून (ता.१८) डाळींब लिलावास (Pomegranate Auction) सुरूवात होणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली.

लासलगावसह परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील गावांमध्ये शेतक-यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pomegranate Auction in Lasalgaon Market Committee from 18 july Nashik Latest Marathi News)

lasalgaon market committee latest marathi news
भऊर घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल; दीड कोटीची फसवणूक

भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवारावर डाळींब लिलाव होतील. उत्पादकांनी आपला माल योग्य प्रतवारी करून २० किलोच्या क्रेटस्मध्ये विक्रीस आणल्यास त्यास जास्तीत जास्त बाजारभाव मिळणार आहे.

किडका, पिचका, लहान (अपरीपक्व), खर्डा असलेला डाळींब वेगळ्या क्रेटसमध्ये विक्रीस आणावा. लिलावानंतर लगेच इलेक्ट्रॉनिक काट्यावर चोख वजनमाप व रोख पेमेंट देण्यात येईल.

डाळींब खरेदीस इच्छुक असणा-या व्यापा-यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्यास त्यांना तात्काळ परवाना देऊन पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सौ. जगताप, उपसभापती सौ. प्रिती बोरगुडे, सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.

lasalgaon market committee latest marathi news
Nashik : पाझर तलाव फुटल्याने रस्त्याला भगदाड; निकृष्ट कामाचे पितळ उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com