Womens Day 2023 : वारकरी पताका हाती घेत तिने स्वीकारला प्रबोधनाचा मार्ग; पहिल्या महिला कीर्तनकार..

Poornima Kadu from remote tribal area and from common family becomes first female kirtankar in igatpuri nashik news
Poornima Kadu from remote tribal area and from common family becomes first female kirtankar in igatpuri nashik newsesakal

इगतपुरी : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा (Tukaram Maharaj) ‘ओलें मूळ भेदी खडकाचें अंग - अभ्यासासी संग कार्यसिध्दी’ हा अभंग असाध्य गोष्टी साध्य करण्यासाठी साधकांना मार्गदर्शक आहे.

त्या अभंगाचा सारांश असा की, दोऱ्याने दगडावर नित्य घर्षण केल्यास दगड कापला जाऊ शकतो. (Poornima Kadu from remote tribal area and from common family becomes first female kirtankar in igatpuri nashik news)

विष पचायला अत्यंत कठीण असते, पण हेच विष सातत्याने थोडे थोडे घेतले तर तेही पचविणे शक्य होते. मातेच्या उदरात जन्माच्या वेळी बाळाचा आकार मावेल एवढी जागा नसतानाही हे जन्म घेणारे बाळ आपल्या गरजेनुसार हळूहळू जागा निर्माण करीत जाते.

ओल्या मूळाचे खडक भेदणे, दोऱ्याने दगड कापणे, सरावाने विष पचणे या साऱ्या गोष्टी अभ्यासाने, सातत्याने आणि प्रयत्नांनी शक्य होऊ शकतात. म्हणजे या जगात अशक्य काहीच नाही.

अशाच प्रकारे अतिदुर्गम,आदिवासी भागातील व सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने वारकरी पताका हाती घेऊन प्रबोधनाचा मार्ग साध्य केला आहे. खडकवाडी या छोट्या वाडीतून वारकरी कीर्तनकार म्हणून एक ‘पौर्णिमा’ खुलली आहे.

संत परंपरा, संत साहित्य, संतांची नियमितता, गायन, वादन आदी शिक्षण जिद्धीने घेऊन तिने इगतपुरी तालुक्यातील पहिली महिला कीर्तनकार म्हणून मान पटकावला आहे. पौर्णिमाताई ज्ञानेश्वर कडू असे तिचे नाव असून तिच्या ध्येयापुढे गगन ठेंगणे झाल्याचे म्हणता येईल.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Poornima Kadu from remote tribal area and from common family becomes first female kirtankar in igatpuri nashik news
Womens Day 2023 : जिल्हा परिषद प्रशासनाची दोरी सावित्रीच्या लेकींच्या हाती!

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तर महिला कीर्तनकारांची महत्वपूर्ण उच्च परंपरा आहे. धर्माचा महिमा, भक्तीचा संदेश आणि समाजाचे प्रबोधन यासाठी संत मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई आदींचे कार्य उच्चतम आहे.

त्यांच्या मार्गाने जाण्याचा छोटासा प्रयत्न पोर्णिमाताई करत आहेत. वडील ज्ञानेश्वर एकनाथ कडू, आई बानूबाई ज्ञानेश्वर कडू यांच्या सुसंस्काराने लहानपणापासून वारकरी परंपरा जोपासत आहे. पौर्णिमा हिने कीर्तनकार होऊन समाज बदलासाठी अनेकांगी मार्गाने सातत्यपूर्ण प्रयत्न करावे अशी तिचे मामा तबला विशारद कैलास म्हसणे यांची इच्छा होती.

त्यानुसार अनेक कार्यक्रमांमध्ये ते पौर्णिमा हिला सोबत न्यायचे. त्यातून परमार्थमार्गाची प्रचंड आवड, पाठांतर, सुंदर चाली ती शिकली. आईवडिलांच्या आणि मामांच्या इच्छेसाठी पौर्णिमा वारकरी शिक्षण घेण्यासाठी मनापासून तयार झाली.

Poornima Kadu from remote tribal area and from common family becomes first female kirtankar in igatpuri nashik news
Womens Day 2023 : कुटुंबासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या जहाँआरा शेख!

त्याआधी तिने श्री क्षेत्र सावकी (ता. कळवण) येथे सुमधूर आणि अभ्यासपूर्ण प्रवचने केली. बीड जिल्ह्यातील चकलांबा (ता. गेवराई) येथील श्री सद्गुरु कल्याण स्वामी संस्थान अंतर्गत अन्नपूर्णा माता मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत तिला दाखल करण्यात आले.

गुरू साध्वी सोनाली दीदी कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पौर्णिमाताई इगतपुरी तालुक्यातील पहिली महिला कीर्तनकार घडली. अभंगाची अभ्यासपूर्ण सोडवण, संतांचे दाखले, संस्कृत श्लोकांचा वापर, थोडीसी विनोद्बुद्धी, प्रमाणाच्या चाली आदींनी पौर्णिमाचे कीर्तन भाविकांना भुलवत आहे.

भाऊ पवन, तन्मय आणि बहिण सानिका यांना पौर्णिमाताईच्या यशाचा प्रचंड आनंद झाला आहे. आईवडिलांसह मामाच्या संस्कारांचे चंद्रमौळी जीवन जगताना वारकरी पताका आणि संतांची भक्ती लोकांपर्यंत सुलभ मार्गाने पोहोचवण्याचे तिचे व्रत आहे.

Poornima Kadu from remote tribal area and from common family becomes first female kirtankar in igatpuri nashik news
Womens Day 2023 : School Vanचे स्टेअरिंग घेत कुटुंबासाठी जागविली ‘आशा’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com