malnutrition
sakal
नाशिक: नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने राबवलेल्या ‘पोषणदूत योजने’मुळे अवघ्या दोन महिन्यांत ९७ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. उपक्रम सुरू करताना जिल्ह्यात ३४५ कुपोषित बालके होती. त्यापैकी १३६ बालके आता मध्यम कुपोषित श्रेणीत परावर्तित झाली आहेत.