Nashik News : ‘एक पोस्टकार्ड पंतप्रधान यांना’; नांदगावला युवा फाउंडेशनचा अनोखा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Post Card

Nashik News : ‘एक पोस्टकार्ड पंतप्रधान यांना’; नांदगावला युवा फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

नांदगाव (जि. नाशिक) : रेल्वे मंत्रालयाकडून नांदगावला दिल्या जाणाऱ्या सपत्निक वागणूक विरोधात आता थेट पंतप्रधान यांना साकडे घालण्यासाठी येथे ‘एक पोस्टकार्ड पंतप्रधान यांच्यासाठी’ अशी मोहीम राबविण्याचा निर्णय युवा फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमीत सोनवणे यांनी दिली. (postcard to Prime Minister unique initiative of Nandgaon Yuva Foundation Nashik News)

सातत्याने पाठपुरावा करून देखील नांदगावच्या स्थानकावर पूर्वीच्या वेळापत्रकात असणाऱ्या गाड्यांपैकी अजूनही काही गाड्यांचे थांबे पूर्ववत देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. यावर अनेक आंदोलने झालीत.

तेवढ्यापुरते वेळ मारून नेण्यासाठी आश्वासित केले गेले. मात्र त्यानंतर पहिले पाढे पंचावन्न या न्यायाने रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात मात्र थांबे देण्यासाठी विविध प्रकारच्या सबबी पुढे केलेल्या आहेत. असे वारंवार दिसून येत असल्याने आता आपल्या न्यायिक मागणीची दखल घेतली जावी.

याकरीता थेट पतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना एक पोस्ट कार्ड लिहावे अशी संकल्पना सुमीत सोनावणे यांनी मांडली आहे. पत्रात थांब्याचे मूळ शोधून द्या अशी मागणी या पत्रात करण्यात येणार आहे. सुमीत सोनवणे यांच्या आवाहनाला नांदगावकर यांनी या अनोख्या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nivruttinath Maharaj Yatrotsav : दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी! पाहा Photos

यंत्रणांकडून दाद नाही

नांदगाव स्थानकांवर नव्या गाड्यांच्या थांब्याची मागणी नाही. अगोदर जेवढे वेळापत्रकात होते तेवढे किमान सुरु झाले पाहिजे अशी आहे. परंतु या माफक मागणीला भुसावळ स्थित रेल्वेची यंत्रणा दाद देत नाही कधी आर्थिक उत्पन्न तर कधी अन्य प्रकारचा तांत्रिक किस काढण्यात भुसावळ मंडळातील यंत्रणा खो घालीत असते.

अन्य ज्या स्थानकांवर गाड्यांचे थांबे दिले. त्या ठिकाणचे मिळणारे उत्पन्न यांची व होणारी तुलना मूळ मागणीला पिछाडीवर नेते असा अनुभव असल्याने एकूण सरसकट तुलनात्मक आढावा घेण्याची मागणी युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

"गाड्यांचे थांबे ही सरळ साधी धोरणात्मक निर्णय प्रक्रिया असताना त्यात होणारा कालहरण संतापजनक असून विधायक मार्गाने जात प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नांदगावकर जनतेने सहभागी व्हावे." - सुमीत सोनवणे संस्थापक युवा फाउंडेशन

हेही वाचा: Nashik Fire Accident : मुंबई नाका पोलीस ठाण्यात जमा असलेल्या दोन चारचाकीना आग!