नाशिक-मुंबई महामार्गावर प्रवास करताना टोल का भरावा?

mumbai nashik highway
mumbai nashik highwayesakal
Updated on

घोटी (जि.नाशिक) : मोसमातील सलग तीन दिवस अतिवृष्टीमुळे मुंबई- नाशिक महामार्गाची वाताहात जागोजागी झाली आहे. कसारा शिवारात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने प्रवासी मिळेल, त्या साधनाने मुंबई- नाशिककडे धाव घेऊ लागल्याने जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग घोटी पोलिस मदत कक्षाने भर पावसात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले. (potholes-on-Mumbai-Nashik-highway-nashik-marathi-news)

मुंबई- नाशिक महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

दोन वर्षांपूर्वी कसारा घाटातील मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दरड कोसळून महामार्ग खचला होता. दुरुस्ती संथगतीने राहिल्याने आजही काही काळ घाटात वाहतूक कोंडी निर्माण होते. विल्होळी ते शहापूर दरम्यान अनेक ठिकाणी महामार्ग खड्डेमय झाला आहे. मे-जून दरम्यान केलेली डागडुजी पावसाने फोल ठरविली. महामार्ग दुरुस्ती अथवा डागडुजी मोसमाच्या वेळेत करण्यामागचे कारण काय असावे, यासाठी तांत्रिक सल्लागार जानेवारी, मार्च महिन्याच्या आत का डागडुजी अथवा दुरुस्ती करत नाही. महामार्गच फोल ठरत असेल तर महामार्गावरील टोल तरी वाहन चालकांनी का भरावा. असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याशिवाय वाहन दुरुस्ती खर्च दुप्पट आणि अंगदुखी वेगळी आशा त्रिवेणी संगमात मुंबई-नाशिक महामार्ग सापडला आहे.

mumbai nashik highway
नाशिकमध्ये कोरोना पाठोपाठ डेंगी, चिकूनगुनियाच्या रुग्णांत वाढ
mumbai nashik highway
'त्या' बहुचर्चित विवाहात बच्चू कडू साधे फिरकलेही नाही!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com