esakal | नाशिकमध्ये कोरोना पाठोपाठ डेंगी, चिकूनगुनियाच्या रुग्णांत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue Infection

नाशिकमध्ये कोरोना पाठोपाठ डेंगी, चिकूनगुनियाच्या रुग्णांत वाढ

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शहरात आता साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. पंधरा दिवसांत डेंगीचे १७७, तर चिकूनगुनियाचे १७५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. सिडको व सातपूर विभागात अधिक प्रादुर्भाव असल्याचे वैद्यकीय विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मलेरिया विभागाकडून डास उत्पत्तीस्थाने शोधण्याची मोहीम राबविली जात आहे. (Increasing patients of dengue and chikungunya in Nashik)

कोरोनाची लाट ओसरली अन् डेंगी हातपाय पसरले

दीड वर्षापासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अन्य साथीच्या आजारांकडे वैद्यकीय व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. मार्चमध्ये कोरोनाची दुसरी लाट शहरात आली. मेअखेर ती ओसरली. सध्या शंभरच्या आत कोरोनाचे रुग्ण शहरात आढळून येत आहेत. त्यानंतर आता डेंगीच्या प्रादुर्भावाला शहर सामोरे जात असून, त्यापाठोपाठ चिकूनगुनियाचे रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मलेरिया विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी अंबड व सातपूरच्या श्रमिकनगरमध्ये मिळून अठरा पथके तैनात करण्यात आली.

हेही वाचा: नाशिक : अखेर 'तो' बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह संपन्न

सातपूर कॉलनी, श्रमिकनगर, कारगिल चौक, नाशिक रोड, पंचवटी, सातपूर भागात ६०४ डेंगीचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी १७७ नमुने पॉझिटिव्ह आढळले, तर ४०० चिकूनगुनियाचे रुग्ण तपासण्यात आले. त्यापैकी १७५ रुग्णांना चिकूनगुनिया झाल्याचे आढळून आले. सातपूर विभागात एक लाख ४० हजार ८१९ घरे तपासण्यात आली, तर सिडको विभागात ७३ हजार ७२२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. डेंगी व चिकूनगुनियाच्या पाठोपाठ आता ताप, सांधेदुखीचे रुग्णही आढळून येत आहेत.

हेही वाचा: इगतपुरी पूर्व भागात चार दिवसांपासून वीज खंडित

पेस्ट कंट्रोल नसल्याचा परिणाम

डेंगीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने जुने टायर, नारळाच्या करंवट्या, घरांच्या परिसरात जेथे पाणी साचत असेल तेथे स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर पेस्ट कंट्रोल होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. पेस्ट कंट्रोलसाठी करोडो रुपये खर्च होऊनही योग्य पद्धतीने औषधांची फवारणी होत नसल्याने करोडो रुपये वाया जात असल्याचे दिसून येत आहे.

(Increasing patients of dengue and chikungunya in Nashik)

हेही वाचा: गटारीचे पाणी मिसळल्याने गोदावरी वाहू लागली दुथडी भरुन!

loading image