esakal | पूर्वमोसमी पावसाचा वादळी वाऱ्यासह दणका; देवळ्यात भाजीपाला, फळांचे नुकसान

बोलून बातमी शोधा

Nashik Rain

पूर्वमोसमी पावसाचा वादळी वाऱ्यासह दणका; देवळ्यात भाजीपाला, फळांचे नुकसान

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : तालुक्यातील सावकी, विठेवाडी, लोहोणेर, ठेंगोडा भागात शुक्रवारी (ता. ३०) पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. यामुळे शिवारातील उन्हाळी कांदा भिजला. तसेच भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. शेतातील कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. येथील कसमादे भागात मिरची, टोमॅटो, शेवगा, टरबूज, खरबूज या फळपिकांचे पावसामुळे नुकसान झाले. शेवग्याची फुले गळून गेल्याने उत्पादन घेणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी केली.

हेही वाचा: धक्कादायक प्रकार! एमआयडीसी, अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्याकडून ऑक्सिजनची पळवापळवी

कोरोनामुळे भाजीपाला विक्री सकाळी ११ पर्यंतच करण्याची परवानगी आहे. तेवढ्या वेळात शेतकऱ्यांना भाजीपाला व फळविक्री करणे शक्य होत नाही. व्यापारी अत्यंत कमी भावात खरेदी करतात आणि जास्त भावात विकतात. यामुळे शेतकरीवर्ग भरडला जात आहे. वेळेवर विक्री करण्यास मर्यादा पडत असल्याने व त्यात भाव परवडत नसल्याने शेवगा, टोमॅटो, कोबी अशी फळपिके फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

हेही वाचा: वा रे पठ्ठ्या! पोलिस ठाण्यातच लगावली पोलिसाच्या कानशिलात; दोघांविरुद्ध गुन्हा