प्रदूषणविरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे; छगन भुजबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदूषणविरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे; छगन भुजबळ

प्रदूषणविरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे; छगन भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जगात सगळीकडे अधिक वाहनांमुळे प्रदूषण होते. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला सामोरे जावे लागत आहे. त्यातून बचाव करण्यासाठी प्रदूषणविरहित वाहनांचा वापर करण्याची आवश्यकता असून, नागरिकांनी अधिक प्रदूषणविरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. २१) येथे सांगितले.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

भुजबळ फार्म येथील कार्यालयात ‘गो ग्रीन कॅब सर्व्हिसेस’चा प्रारंभ श्री. भुजबळ आणि महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी श्री. भुजबळ बोलत होते. माजी आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, साहित्य संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक जगदीश पवार, श्रमिक शहा, मोहित भाटिया, अनुप मढय्या आदी उपस्थित होते.

नाशिकमध्ये पहिल्यांदाच ‘गो ग्रीन’ उपक्रम सुरू होत आहे. हा चांगला उपक्रम आहे. नाशिकमध्ये इतर ठिकाणांच्या तुलनेत प्रदूषण कमी असून, नाशिकचे वातावरण अधिक चांगले आहे. नाशिक शहर अधिक स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त कसे राहील, यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की ‘गो ग्रीन’ हा उपक्रम नाशिकमधील तीन महिलांनी सुरू केला. उद्योग व्यवसायात महिला पुढे येत आहेत. तसेच नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘गो ग्रीन’तर्फे प्रतिनिधींना जाण्यासाठी मोफत प्रवासाची सोय केली आहे. नाशिकची दिल्ली होऊ नये म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. पर्यावरणपूरक वाहने वापरण्यास नाशिक महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

हेही वाचा: टीम इंडियाकडून ब्लॅक कॅप्सला व्हाइट वॉश!

महिलांची ‘गो ग्रीन’ संकल्पना

‘गो ग्रीन’ संकल्पना हीना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या या इलेक्ट्रिक कॅब्सच्या माध्यमातून राबवीत आहेत. नाशिककरांना पर्यावरणापूरक आणि निसर्गाशी जोडणारी सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. नाशिकमधील वाढत्या वाहनांच्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी पहिले पाऊल असल्याचे तिघींनी म्हटले आहे.

loading image
go to top