Kumbha Mela 2027-28 : सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्राथमिक नियोजन

Nashik Kumbha Mela 2027-28 Latest marathi news
Nashik Kumbha Mela 2027-28 Latest marathi newsesakal

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून महापालिकेकडून नियोजनाला सुरवात झाली आहे. लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या सूचनांनुसार तयारीचे नियोजन करण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळा पार पाडताना निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी त्यांना महापालिकेच्या व्यासपीठावर निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Preliminary Planning of Kumbh Mela 2027 2028 Simhastha Kumbh Mela nashik Latest Marathi News)

२०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. २०१५ मध्ये पार पडलेला सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक म्हणून साजरा करण्यात आला. पुढील कुंभमेळादेखील नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित असावा, अशी मागणी नाशिकमधील साधू, महंतानी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे दीड महिन्यापूर्वी केली होती.

त्या अनुषंगाने श्री. गमे यांनी महापालिकेकडे साधूग्रामसाठी उपलब्ध असलेली जागेची मागणी व प्रत्यक्षात भूसंपादन आदी प्रकारची तांत्रिक माहिती मागविताना कुंभमेळ्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावत सिंहस्थ कामांचा आढावा घेतला.

सिंहस्थापूर्वी पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. त्या अनुषंगाने बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा. नगररचना व मिळकत विभागाने पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागाने सेवेसंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना या वेळी आयुक्तांनी दिल्या.

Nashik Kumbha Mela 2027-28 Latest marathi news
मालेगाव : मोसम नदीत बुडाले दोघे तरुण; शोध कार्य सुरु

सिंहस्थ हा अधिकारी वर्गाचा नसावा. सिंहस्थाचे नियोजन करताना लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नाशिककरांच्या सूचनादेखील महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नागरिकांकडून कुंभमेळ्यासंदर्भात सूचना मागविण्याचे निर्देश दिले.

कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना नागरिकांना थेट पोर्टलवर मांडण्यासाठी व्यासपीठ तयार करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये चांगले कामगिरी केलेल्या महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कुंभमेळ्याच्या नियोजनात सामावून घ्यावे अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ पुलकुंडवार यांनी दिल्या.

प्रदूषणमुक्त गोदावरीला प्राधान्य

देशभरातून लाखो भक्त गोदावरीत स्नान करण्यासाठी दाखल होतात. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रदूषणमुक्त गोदावरीला प्राधान्य देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. नमामि गोदा प्रकल्पाकडे त्यासाठी लक्ष दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचे नाले बंदिस्त करून थेट मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

"सिंहस्थ कुंभमेळाला अजून अवकाश असला तरी पूर्वतयारीचा भाग म्हणून नियोजन करणे आवश्यक आहे या नियोजनात सर्वसामान्य नाशिककर सहभागी झाला पाहिजे यासाठी नागरिकांकडून सूचना मागविल्या जाणार आहे."

- डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त महापालिका.

Nashik Kumbha Mela 2027-28 Latest marathi news
बबन घोलप यांच्यावर कारवाई करा; मिलिंद यावतकर यांचे निवडणूक आयोगाला निवेदन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com