esakal | ऑगस्ट महिना कोरोनाविरोधातील तयारीचा! नाशिकमधील प्रशासकीय यंत्रणा व्यस्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona

नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ऑगस्टमध्ये तयारी

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत तयारी पूर्णत्वाच्या प्रशासकीय यंत्रणेला सूचना आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी पुढील महिनाभर प्रशासकीय यंत्रणा तयारीत व्यस्त राहणार आहे. पुढील महिना कोरोनाविरोधातील तयारीचा महिना असणार आहे. (Preparations-for-third-wave-of-corona-in-August-marathi-news-jpd93)

पुढील महिना कोरोनाविरोधातील तयारीचा महिना

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी यंत्रणा तयारीला लागली आहे. जिल्ह्यात त्यासाठी बालरोगतज्ज्ञांचा कृतिदल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कार्यान्वित केला आहे. जिल्हा बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या अभ्यासानुसार जिल्ह्यात तिसऱ्या लाटेत सव्वा लाखांवर बालक बाधित होण्याची शक्यता असून, त्यातील ९५ हजारांवर बालक घरगुती उपचारानेच बरे होतील. साधारण पाच टक्के बालकांवर मात्र रुग्णालयात उपचार करावे लागणार असल्याचे गृहीत धरून जिल्ह्यात पाच हजार बेडची सोय केली जाणार आहे.

हेही वाचा: अथांग सागराशी मीही करणार दोन हात.. कोकणगावच्या साहिलची जिद्द

हेही वाचा: इगतपुरी तालुक्यातील धरणक्षेत्रात जोरदार जलधारा

loading image