Nashik News: हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला वानरराजाची उपस्थिती; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

monkey came during inauguration of Hanuman temple.
monkey came during inauguration of Hanuman temple.

Nashik News: भारतीय संस्कृती व परंपरेनुसार मंदिर व नवीन हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत करण्यात आली. भाविकांच्या उपस्थितीत व ढोलताशांच्या गजरात मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भाविकांकडून धान्य गोळा करून त्यात मूर्ती ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा झाली.

ब्राह्मण पूजा मांडत असताना, प्रत्यक्ष हनुमानाच्या रूपात पूजेच्या ठिकाणी वानराने हजेरी लावली. पूजेसाठी ठेवलेल्या नागवेलीच्या पानाचा विडा खाऊन सर्व भाविकांना दर्शन दिले. नंतर शांतपणे तेथून निघून गेले. (presence of monkey at inauguration of Hanuman temple nashik news)

वानराचे आगमन होणे, हा केवळ योगायोग नसून, जागृत देवस्थान असल्याची प्रत्यक्ष अनुभुती भाविकांना आली. याबाबत दिवसभर परिसरात चर्चा सुरू होती. सर्व भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला.

येथील प्रगतिशील शेतकरी रमेश किसनराव विधाते यांच्या घराशेजारील शेतात गेल्या पाच दशकांपासून वडिलोपार्जित हनुमान मंदिर होते. हे मंदिर जागृत देवस्थान असल्याची मान्यता आहे. मंदिर व हनुमानाची मूर्ती प्राचीन असल्याने त्यांच्या शेतातील जागेत प्रशस्त मंदिर उभारावे व नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी घरातील सदस्यांची मनस्वी इच्छा होती. त्यासाठी घरातील सदस्य व परिसरातील तरुणांनी पुढाकार घेत मंदिरासाठी जागा, मंदिर उभारणी, मूर्ती, कळस, घंटा, अशा छोट्या-छोट्या गोष्टींची दखल घेतली.

monkey came during inauguration of Hanuman temple.
Nashik News: तपोवनात अवतरली अयोध्यानगरी! संत जनार्दन स्वामी महाराजांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित

नवीन मंदिर व मूर्ती उभारणीसाठी होणारा खर्च लोकसहभागातून करावा, असे ठरविले. मंदिर उभारणीसाठी लागणारा सर्व खर्च विधाते कुटुंब करणार असल्याचे रमेश विधाते यांनी सांगितले. मूर्ती, कळस, घंटा व इतर अनुषंगीक आवश्यक गोष्टी लोकवर्गणीतून करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी परिसरातील भक्तांनी सढळ हाताने मदत करण्याची तयारी दर्शविली. त्याप्रमाणे मंदिर उभारणीस सहा महिन्यांपूर्वी सुरवात झाली.

पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्करराव बनकर, सदस्य विनायक खोडे, केशवराव बनकर, हर्षदा जाधव यांनी तत्काळ मंदिर परीसरात वीजखांब उभा करून लाईटची व्यवस्था करून दिली. उत्कृष्ट दर्जाचे सुबक मंदिर बांधकाम पूर्ण झाले. नंतर वणी तेथील मूर्तीकारांनी मंदिर परिसरात भर पडावी, अशी भव्य व सुबक मूर्ती आपल्या कलेच्या माध्यमातून घडविली होती.

monkey came during inauguration of Hanuman temple.
Nashik News: चांदवडला बेवारस अवस्थेत गायीचं वासरू थंडीने तडफडतय; नगरपरिषदेचे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com