Nandurbar Encrochment News : अतिक्रमणांवर पडणार हातोडा; सोमवारी अंतिम मुदत

Akkalkuwa Gram Panchayat News
Akkalkuwa Gram Panchayat Newsesakal

Nandurbar News : अक्कलकुवा शहरातील विविध ठिकाणी असलेल्या परिसरात व्यावसायिकांनी ठिकठिकाणी अतिक्रमण केले आहे.

अतिक्रमणामुळे शहराचा विकास खुंटला आहे. अतिक्रमण काढण्यात येणार असून, ही कारवाई ग्रामपंचायत प्रशासन गटविकास अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. (Impact of Pulkit Singh work in Akkalkuwa Taluka hammer will fall on encroachments Monday deadline Nandurbar News)

अक्कलकुवा शहर हेच तालुक्यातील मुख्य केंद्र आहे. मोलगी नाका ते बसस्थानकापर्यंत व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून रस्त्यावर दुकानातील साहित्य खरेदीदारांना आकर्षित करीत आहेत.

यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे स्थायी तथा अस्थायी दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे तालुक्यातील विविध कामासाठी आलेल्या नागरिकांचीदेखील हे अतिक्रमण काढावे, अशी अपेक्षा होती.

अतिक्रमणामुळे शहर सौंदर्यीकरणही वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अक्कलकुवा पंचायत समितीत १९ मेस झालेल्या ग्रामसेवकांच्या सभेत शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी गटविकास अधिकारी पुलकित सिंह यांनी ग्रामवसेवकांना सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Akkalkuwa Gram Panchayat News
Nashik Traffic News : ट्रॅफिक जामचा तिढा काही सुटेना; सायंकाळी 2 तास लागतात वाहनांच्या रांगाच रांगा

पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणधारकांवर कारवाई होण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. सभेनंतर कारवाईच्या पहिल्या टप्प्यात (ता. १९) मेपासून शहरातील तहसील कार्यालय ते हॉटेल मंदाकिनीदरम्यान असलेल्या तब्बल ४५ अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली होती.

नोटिशीची अंतिम मुदत १५ दिवसांची असून, ६ जूनला संपत आहे. सोमवारपासून हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे.

अतिक्रमण काढल्यासाठी गटविकास अधिकारी पुलकित सिंह यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ठोस कारवाई होणार याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.

Akkalkuwa Gram Panchayat News
Jalgaon News : झाडाची फांदी पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com