esakal | ग्राहकांना गारवा देणारे टरबूज शेतकऱ्यांसाठी तापदायक!
sakal

बोलून बातमी शोधा

watermelon

ग्राहकांना गारवा देणारे टरबूज शेतकऱ्यांसाठी तापदायक!

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून सर्वाधिक पाण्याचे प्रमाण असलेल्या टरबुजाला(Watermelon) ग्राहक प्रथम पसंती देतात. परंतु, लॉकडाउनमुळे(lockdown) फळे(fruits) आणि भाजीपाला(vegetables) यांच्या दरात कमालीची घसरण झाली आहे.(The lockdown has led to a sharp fall in prices of fruits and vegetables.)

शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना फळविक्री

टरबुजाचे घाऊक दर तीन ते चार रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आल्यामुळे ग्राहकांना थंडावा देणारे टरबूज शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत उत्पादनातील तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून(farmers) थेट ग्राहकांना फळविक्री करण्यात येत असल्याचे चित्र मोसम खोऱ्यात पाहायला मिळत आहे

कोरोनाच जबाबदार!

गेल्या वर्षी केंद्र शासनाने, तर यंदा राज्य सरकारने कोरोनाचा(corona virus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे एप्रिलपासून राज्यात लॉकडाउन जाहीर केल्याने फळ व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. उन्हाळ्याच्या हंगामात सर्वाधिक मागणी असलेले टरबूज मातीमोल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनासारख्या रोगराईच्या काळात इम्युनिटी बूस्टर(immunity booster) असलेल्या फळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, फळविक्रीसाठी सकाळी अकरापर्यंतचीच वेळ देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात फळविक्रीवर निर्बंध आल्याने दरात घट झाल्याचे फळ व्यापारी इब्राहिम बागवान यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

हेही वाचा: राजकीय पक्षाच्या नावाखाली कायदा हातात घ्याल; तर पडेल महागात - पो.आ.पांडे

लॉकडाउनने मोडले आर्थिक कंबरडे

मोसम खोऱ्यात उन्हाळ्यात अनेक शेतकरी दोन महिन्यांचे नगदी पीक म्हणून टरबुजाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. यंदा अनेक शेतकऱ्यांनी दोन महिन्यांच्या काळात शेणखत, मल्चिंग पेपर(Mulching paper), ठिबक सिंचन(Drip irrigation), लागवड मजुरी(Planting wages), विविध रासायनिक व सूक्ष्म खतांची(manure) मात्रा आदींच्या माध्यमातून एकरी सुमारे एक लाखाचा खर्च करून वजनदार टरबूज पिकवले आहे. एकरी सरासरी २५ ते ३० टन टरबुजांचे उत्पादन घेतले जाते. परंतु, सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनच्या दृष्टचक्रामुळे अतिशय कमी भावाने फळांचे व्यापारी टरबूज मागणी करत असल्याने उत्पादन खर्चदेखील भरून निघणार नाही, अशी प्रतिक्रिया तळवाडे (ता. मालेगाव) येथील टरबूज उत्पादक शेतकरी एकनाथ शिरोळे यांनी दिली.

टरबूज आहे गुणकारी

टरबूजमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाण्याचे प्रमाण असल्याने उष्णतेचा दाह कमी होऊन आरोग्यवर्धक(healthy) असलेले टरबूज सर्वांचेच आवडते फळ मानले जाते. आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. जीवनसत्त्वाच्या मुबलक प्रमाणामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती यामुळे मजबूत होते. हृदय(heart) व रक्तवाहिन्यांसंबंधी(Blood vessels) रोगांवर आळा घालण्यासाठीही टरबूज खूप प्रभावी आहे. रक्तदाब(blood pressure) आणि साखरेची पातळी(diabetes) नियंत्रित करण्यास यामुळे मदत होते.

हेही वाचा: मी ‘ईडी’ आयुक्त बोलतोय....‘ईडी’च्या नावाचा गैरफायदा घेत मागितली खंडणी!

मातीमोल भावाने विक्री

शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे उत्तम दर्जाचे टरबूज तयार झाले आहे. परंतु लॉकडाउनमुळे फळविक्रीसाठी सकाळी अकरापर्यंत सूट असल्याने शेतमालाला उठाव नाही. लॉकडाउनच्या फटक्यामुळे फळे, भाजीपाला यांच्या किमती पन्नास टक्क्यांनी घसरल्या आहेत. दोन महिन्यांच्या काळात मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्याने दोन किलोपासून सहा किलोपर्यंतचे फळ तयार केले. कोरोनाच्या भीतीमुळे शेतात कामासाठी मजूर मिळत नाहीत. फळांची साठवणूक करणे शक्य नसल्याने मातीमोल का असेना; पण विक्री करण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रगतिशील शेतकरी माधव सावंत यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

loading image