कांदा, टोमॅटोचे भाव कडाडले; सर्वसामान्य नागरिक त्रस्त

prices of onions and tomatoes skyrocketed marathi news
prices of onions and tomatoes skyrocketed marathi news Sakal


बिजोरसे (जि. नाशिक) : ऐन सणासुदीच्या दिवसांत महागाईचा भडका उडाल्यामुळे सर्वसामान्यांच्या महिन्याच्या खर्चाचे गणित कोलमडून गेले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्याच वर्गात मोडणाऱ्या भाज्यांचे दरही गगनाला भिडू लागले आहेत. डिझेल दरवाढीमुळे फटका बसला आहे. त्यामुळे आता खर्च नेमका ठरलेल्या पैशांत कसा बसवायचा, हाच प्रश्न सर्वांपुढे उभा ठाकला आहे. भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रमधून दिल्लीत मोठ्या प्रमाणात टोमॅटो आणि कांदा पोचतो. पण, या दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. डिझेलच्या वाढत्या दराचाही परिणाम होताना दिसतो आहे. वाहतुकीचा खर्चही मोठ्या प्रमाणात होतो आहे

टोमॅटोचा दर प्रति ७० रुपये किलोवर पोचला आहे. अधिक दराने झालेली वाढ पाहता रोजच्या जीवनामध्ये व हॉटेलमध्ये लागणाऱ्या भाज्यांची खरेदी करताना आता दोनदा विचार केला जात आहे. पालेभाज्यांच्या आणि इतर फळभाज्यांच्या दरांचीही वाढ झाली आहे. कांद्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. आता शेतकऱ्यांकडे कांदा नसून मोठ्या प्रमाणात कांदा सडलेला आहे. मागणी देशांतर्गत बाजारात वाढलेली आहे. तोही कांदा आज ४० रुपये किलोने मिळत आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देशातील बहुतांशी भागात पावसाचे प्रमाण यंदा जास्त असल्या कारणाने काही भागातूनही अजून पाऊस ओसरलेला नाही. त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, म्हणून दर वाढले आहेत. शिवाय इंधनाची दरवाढ दिवसेंदिवस होत असल्यामुळे शेतमालाची ने-आण करताना वाहतुकीचा खर्च होत असल्याने त्याचा भारही सर्वसामान्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या खर्चामध्ये संपूर्ण बजेट कोलमडेल आहे. येणाऱ्या काळामध्ये जर का अशीच दरवाढ राहिली तर कसे जीवन कंठावे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.

पावसामुळे लाल कांदा सडून गेला व देशांतर्गत मागणी वाढली म्हणून काद्यांला भाव वाढला. कर्नाटकचा कांदा सुरू झाल्यावर भावावर परिणाम होईल.
-धनंजय पगार, कांदा व्यापारी, नामपूर

prices of onions and tomatoes skyrocketed marathi news
नाशिक : दसऱ्यानिमित्त उजळली सोन्याची बाजारपेठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com