महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढवली, 'या' दिवसापासून होणार शाळा सुरू | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

schools

महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढवली - शिक्षणाधिकारी

कोरोना प्रादुर्भावाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा 4 ऑक्टोबर 2021 पासून ऑफलाईन स्वरुपात सुरू झाल्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण 14 दिवसांची सुट्टीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी केली होती. मात्र आता ही सुट्टी वाढविण्यात आल्याचे समजते. यामुळे प्राथमिक आणि माध्यमिकच्या शाळा वेगवेगळ्या तारखांना सुरू होत आहेत. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत. वाचा सविस्तर...

महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढवली

वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन दिवाळी सुट्टीची माहिती दिली होती. या काळात शाळांकडून सुरू असलेले ऑनलाईन अध्यापनही बंद राहील, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. त्यानुसार नाशिकमध्ये जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांना 10 पर्यंत सुटी होती. त्यामुळे त्या 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या. मात्र नाशिकमध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा: ST Workers Strike - लालपरी डेपोत आणि खासगी गाड्या फलाटावर

येत्या 15 नोव्हेंबरपासून

आता महापालिकेच्या प्राथमिक शाळांचे वर्ग येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. मात्र, दुसरीकडे माध्यमिकच्या शाळा या 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही. एम. कदम यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून शाळांची सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता या शाळांची दिवाळी सुट्टी 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सोबतच 21 नोव्हेंबरला रविवार आहे. त्यामुळे त्यांचे वर्ग आता 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, महापालिका शाळांची सुट्टी वाढवली आहे. आता शाळा 15 नोव्हेंबरपासून सुरू होतील. याबाबतचे परिपत्रक काढण्यात येणार आहे,

हेही वाचा: मुंबई पोलिसांना पाहून पळताना आरोपी तिसऱ्या मजल्यावरुन पडला

Web Title: Primary Municipal Schools Diwali Vacations Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top