narendra modi
narendra modifile photo

PM Modi Nashik Visit: मोदींच्‍या उमेदवारीने चौफेर विकास! उद्योग-बांधकाम-व्‍यवसाय क्षेत्राच्‍या अपेक्षा उंचावल्‍या

कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला पायाभूत सुविधांच्‍या विकासाची पर्वणी असते.

PM Modi Nashik Visit : कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला पायाभूत सुविधांच्‍या विकासाची पर्वणी असते. राज्‍यातील व देशातील प्रमुख शहरांशी दळणवळणव्‍यवस्‍था चांगली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उमेदवारी नाशिकसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

त्‍यांच्‍या नेतृत्वाखाली नाशिकचा चौफेर विकास होईल, असा विश्‍वास शहरवासीयांमधून व्‍यक्‍त केला जात आहे. (Prime Minister Narendra Modi candidature can be crucial for Nashik news)

उद्योग, बांधकाम, व्‍यवसाय क्षेत्रातील उद्योजकांच्या अपेक्षा मोदींच्‍या उमेदवारीच्‍या चर्चेने उंचावल्‍या आहेत. शहराच्‍या अर्थकारणाला सुदृढ बनविणारे औद्योगिक, बांधकाम, व्‍यवसाय क्षेत्रातून पंतप्रधान मोदींच्‍या उमेदवारीच्‍या चर्चेचे स्‍वागत केले जात आहे.

वाराणसीचे उदाहरण देताना मोदींच्‍या उमेदवारीने नाशिकचाही कायापालट होईल. दळणवळणव्‍यवस्‍था आणखी सुधारेल, पायाभूत सुविधांचा विकास होईल. अधिकाधिक लोकांना नाशिकचे आकर्षण वाटू लागेल. यामुळे बांधकाम क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असे मान्‍यवरांचे म्‍हणणे आहे.

जगाच्‍या नकाशावर पोहोचू

''वास्‍तव्‍यासाठी नाशिकला प्राधान्‍य देणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून उमेदवारी केली तर ही नाशिककरांसाठी ऐतिहासिक घटना ठरेल. पुढील पाच वर्षांमध्ये नाशिक जगाच्‍या नकाशा‍वर ठळकपणे दिसेल. बांधकाम क्षेत्रासह इतरही उद्योग, व्‍यवसायांवर सकारात्‍मक परिणाम होऊन नाशिकचे अर्थचक्र गतिमान होण्यास मदत होईल.''- अभय तातेड, अध्यक्ष, नरेडको

narendra modi
Modi Lakshadweep Visit: "...पण मणिपूरला जाणार नाही"; PM मोदींच्या लक्षद्वीपमधील फोटोशूटवरुन काँग्रेसचा निशाणा

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास

''उद्योग, व्‍यवसायाच्‍या दृष्टीने नाशिकमध्ये प्रचंड संधी उपलब्‍ध आहे. मुंबई, पुण्यासह इतर शहरांशी असलेल्‍या कनेक्टिव्हिटीचा फायदा घेताना मोठे उद्योग उभे राहू शकतील. डिफेन्‍स हब होण्याची क्षमता नाशिकमध्ये असून, पंतप्रधान मोदी यांच्‍या उमेदवारीमुळे हे स्‍वप्‍न झपाट्याने प्रत्‍यक्षात उतरू शकते.

क्‍वालिटी सिटी प्रकल्‍प राबविताना संबंधित संस्‍थेमार्फत नाशिकची सर्वप्रथम निवड केली गेली. मोदींच्‍या उमेदवारीने नाशिक शहरासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास होईल, अशी खात्री आहे. बांधकाम क्षेत्रालाही चालना मिळेल.''- क्रुणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो

''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता भारताचे नव्हे तर जगाचे नेते आहेत. त्यांनी वाराणसीमधून लोकसभा लढविल्‍यानंतर त्या शहराचा कायापालट करताना, खऱ्या अर्थाने अयोध्येत रूपांतर झालेले आहे. नाशिक नगरीदेखील प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून, या भूमीतून लोकसभा लढविल्‍यास नक्कीच नाशिकचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

इतकेच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील विकासाचा अटकलेला गिअरही फिरण्यास चालना मिळेल. त्यामुळे नाशिकच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा मोठा फायदा होणार आहे.''- निखिल पांचाळ, अध्यक्ष, आयमा

narendra modi
PM Modi Shirdi Visit: ४० वर्षांची प्रतिक्षा संपली; विखे पाटलांनी मानले PM मोदींचे आभार

''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या भूमीतून निवडणूक लढविल्‍यास केवळ कृषी व पायाभूत क्षेत्रातच नाही तर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. जगाचे डिफेन्स इन्होवेशन हब म्हणून भारताकडे पाहिले जाते असून, हे हब नाशिकला साकारेल. त्र्यंबक व नाशिकचा स्वतंत्र कॉरिडॉर होऊन, यामुळे देशातीलच नव्हे जगातील पर्यटकांची संख्या नाशिकमध्ये वाढेल. तसेच देशातील नव्हे, तर आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुधारण्यास मदत होईल.

राज्‍याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना नाशिकमधून बिनविरोध निवडून दिल्‍यानंतर त्यांनी नाशिकला एचएएलसारखा प्रकल्प दिला. तसेच पंतप्रधान मोदींच्‍या उमेदवारीतून काय, काय मिळेल याची कल्‍पना आपण करू शकत नाही. लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे त्यांनी नाशिकमधूनच निवडणूक लढवावी.''- धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

''यशवंतराव चव्‍हाणांच्‍या रूपाने बिनविरोध निवडून देण्याची नाशिककरांची परंपरा असून, पंतप्रधान मोदींचीही निवड बिनविरोध होऊ शकते. लोकसभा निवडणुकीत त्‍यांच्‍या उमेदवारीने नाशिककरांना सुवर्ण संधी येतील. त्‍यामुळे नागरिकांनी एकमुखी मागणी करताना आगामी नाशिक दौऱ्यावर १२ जानेवारीला त्‍यांच्‍यापर्यंत ही भावना पोहोचवायला हवी. त्‍यांच्‍या रोड-शोदरम्‍यान ही जनभावना त्‍यांना कळविण्याची संधी असेल.''- प्रफुल्‍ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्‍य किराणा घाऊक व्‍यापारी संघटना

''पंतप्रधान विश्‍वनेते असून, त्‍यांनी नाशिकची निवड केल्‍यास ही नाशिककरांसाठी अभिमानास्‍पद गोष्ट ठरेल. त्‍यांच्‍या नेतृत्वाखाली नाशिकसह महाराष्ट्राचा विकास घडू शकेल. त्‍यांची उमेदवारी अंतिम झाल्‍यास बिनविरोध निवडीच्‍या इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास वाटतो. उद्योग, व्‍यवसायाच्‍या विकासाच्‍या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक ठरेल. यामुळे अर्थकारणाला चालना मिळून अधिकाधिक रोजगाराच्‍या संधी नाशिकमध्ये निर्माण होण्यास मदत होईल.''- संजय सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

narendra modi
PM Modi Nashik Visit: पंतप्रधानांचा रोड-शो एक किमी अंतरासाठी; बंदोबस्तासाठी परजिल्ह्याचे पोलिस येणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com