esakal | धक्कादायक! सॅनिटायझर पिऊन कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न; मध्यवर्ती कारागृहातील प्रकार

बोलून बातमी शोधा

Prisoner attempts suicide by drinking sanitizer
धक्कादायक! सॅनिटायझर पिऊन कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न; मध्यवर्ती कारागृहातील प्रकार
sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक रोड : सध्या राज्यभरात कोरोनाचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. दररोज शेकडो लोक या महामारीच्या काळात मृत्यूमुखी पडत आहेत. यामुळे कोरोनापासून बचावासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दरम्यान मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने बुधवारी (ता.२१) रात्री सॅनिटायझर प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

अविनाश अशोक जाधव हे मध्यवर्ती कारागृहात राज्यभरातील कैदी आहेत. अविनाश अशोक जाधव (३०) हा काही महिन्यांपासून कारागृहात आहे. जाधव याला यापूर्वी संचित रजा मंजूर झाली होती. ती मिळाल्यावर तो घरी गेला. मात्र, रजा संपल्यावर तो स्वतःहून कारागृहात हजर झाला नव्हता. तेव्हा पोलिसांच्या मदतीने त्याला पकडून कारागृहात आणले होते.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

नेमके काय कारण?

त्याला पुन्हा संचित रजा हवी होती. अविनाश जाधवने कारागृह प्रशासनाकडे रितसर अर्ज दाखल केला होता. मात्र, आधी रजा घेतलेली असल्याने अर्ज नामंजूर करण्यात आला होता. तो राग मनाशी बाळगून अविनाश जाधव याने बुधवारी मध्यरात्री कारागृहात सॅनिटायझर प्राशन केले. संचित रजा मंजूर केली नाही म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिक रोड पोलिस ठाण्यात याबाबात नोंद करण्यात आली आहे.

कारागृह कर्मचाऱ्यांनी त्याला त्वरित जिल्हा रुग्णालायात दाखल केले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, कारागृह प्रशासनाकडून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जाधव विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. कैद्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती सुधारत आहे.

हेही वाचा: तर मुख्यमंत्री ठाकरेंनी देखील राजीनामा द्यावा! भाजपचा शिवसेनेवर पलटवार