चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार

k-n-kela-high-school-jail-road-nashik-schools-0.jpg
k-n-kela-high-school-jail-road-nashik-schools-0.jpg
Updated on

नाशिक : (नाशिकरोड) बाथरूमला जातो म्हणून निमित्त करून तो फरार झाला. जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तो पळून गेला अशी चर्चा सध्या वर्तुळात रंगते आहे.  लॉकडाऊनच्या काळात शाळेला बंदोबस्तही देण्यात आला तरीही तो फरार झाल्याची गंभीर घटना घडली आहे.

अशी आहे घटना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे नाशिकरोड येथील कारागृहात नवीन कैयद्यांना प्रवेश दिला जात नाही त्यामुळे नवीन भरती होणाऱ्या कच्चा कैद्यांची व्यवस्था जवळच असणाऱ्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या के. एन. केला या इंग्रजी शाळेत उपजेल तयार करून करण्यात आली आहे. या जेलमधून दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अजय राज वाघेला हा 379 या गुन्ह्यातील कैदी बाथरूमला जातो म्हणून निमित्त करून फरार झाला. यावेळी याठिकाणी सुरक्षा व्यवस्था दोन अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांच्या हातात होती मात्र जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा कैदी पळून गेला अशी चर्चा सध्या कारागृह वर्तुळात रंगते आहे. 

पोलिसांना चुकांडी देऊन फरार झालेल्या या कैद्याचा शोध सुरु असून जेलचे पोलीस हवालदार अब्दुल अजीज यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. पुढील प्रकरणाचा शोध नाशिकरोड पोलीस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

tribal youth protest outside commissionerate Nashik
Shalarth ID Scam
School Education Minister Dadaji Bhuse during the meeting on the pending Satana–Mangrul National Highway project.
Nashik Earthquake
Marathi News Esakal
www.esakal.com